मुंबई - मनसेच्या आज झालेल्या महामोर्चानंतर झालेल्या सभेत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी सीएए आणि एनआरसीबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली. त्याबरोबरच पाकिस्तान आणि तिथे राहणाऱ्या हिंदू अल्पसंख्याकांबाबतही राज ठाकरे यांनी मोठे विधान केले आहे. पाकिस्तान हा दहशतवादाचा अड्डा बनला आहे. तसेच, पाकिस्तानात अत्याचार होत असलेल्या हिंदू अल्पसंख्याकांना हिंदुस्थानात नाही घ्यायचं? तर काय करायचं? असा सवाल राज ठाकरे यांनी केला आहे. राज ठाकरे म्हणाले की, पाकिस्तान दहशतवाद्यांचा अड्डा झाला आहे. अमेरिकेत 9/11 ला जो दहशतवादी हल्ला झाला होता. त्याचा मुख्य सूत्रधार ओसामा बिन लादेन पाकिस्तानात सापडला. आपल्या देशात देशात अनेक बॉम्बस्फोट झाले, शेकडो जण मारले गेले. या स्फोटामागे कोण होतं? मुंबईत 1993 साली बॉम्बस्फोट झाले. ते घडवणाऱ्या दाऊद इब्राहीमला पाकिस्तानाने थारा दिला आहे.''
पाकिस्तान आणि तेथील हिंदूंबाबत राज ठाकरेंनी केले मोठे विधान, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2020 18:07 IST
पाकिस्तान आणि तिथे राहणाऱ्या हिंदू अल्पसंख्याकांबाबत राज ठाकरे यांनी मोठे विधान केले आहे.
पाकिस्तान आणि तेथील हिंदूंबाबत राज ठाकरेंनी केले मोठे विधान, म्हणाले...
ठळक मुद्देपाकिस्तान हा दहशतवादाचा अड्डा बनला आहेपाकिस्तानात अत्याचार होत असलेल्या हिंदू अल्पसंख्याकांना हिंदुस्थानात नाही घ्यायचं? तर काय करायचं?सीएए, एनआरसीवर कायद्याची माहिती नसणारेही टीका करताहेत