Join us

शिवसेनेची अवस्था केसाळ कुत्र्यासारखी, राज ठाकरेंची बोचरी टीका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2018 20:02 IST

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी भारत बंदबाबतच्या भूमिकेवरून लक्ष्य केले आहे. शिवसेनेला स्वत:ची भूमिका राहिलेली नाही. त्यामुळे त्यांना जास्त भाव देण्यात अर्थ नाही.

मुंबई - मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी भारत बंदबाबतच्या भूमिकेवरून लक्ष्य केले आहे. शिवसेनेला स्वत:ची भूमिका राहिलेली नाही. त्यामुळे त्यांना जास्त भाव देण्यात अर्थ नाही. त्यांची अवस्था केसाळ कुत्र्यासारखी झाली आहे. पैशाची कामे अडकतात तेव्हा शिवसेनेकडून सत्तेतून बाहेर पडण्याच्या धमक्या देण्यात येतात. मात्र ही कामे मार्गी लागल्यानंतर शिवसेना सत्तेत कायम राहते, अशी बोचरी टीका राज ठाकरे यांनी केली. आज काँग्रेससह विरोधी पक्षांनी आयोजित केलेल्या भारत बंदला मनसेने पाठिंबा दिला होता. दरम्यान, बंद आटोपल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना राज ठाकरे यांनी शिवसेनेवर जोरदार टीकास्त्र सोडले. तसेच केंद्रातील सत्तेवर असलेले भाजपा सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही राज ठाकरेंनी जोरदार टीका केली. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने देशाला खड्ड्यात घालण्याचे काम केले आहे. मोदी सरकारने केलेली  नोटाबंदी फसली, लागू केलेला जीएसटी फसला. त्यातून झालेले नुकसान भरून काढण्यासाठीच यांनी आता पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ करून लोकांच्या खिशात हात घातला आहे, असे राज ठाकरे म्हणाले. 

टॅग्स :राज ठाकरेमनसेशिवसेना