भाऊबीजनिमित्ताने राज-उद्धव पुन्हा आले एकत्र; आता युतीच्या घोषणेची उत्सुकता
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 06:11 IST2025-10-24T06:10:00+5:302025-10-24T06:11:00+5:30
उद्धव आणि राज हे सहकुटुंब त्यांच्या चुलत बहीण जयजयवंती यांच्या घरी एकत्र आले होते.

भाऊबीजनिमित्ताने राज-उद्धव पुन्हा आले एकत्र; आता युतीच्या घोषणेची उत्सुकता
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : आगामी मुंबई महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंच्या मागील चार महिन्यांत भेटीगाठी वाढल्या असून बुधवारी भाऊबीजेनिमित्त हे दोन्ही बंधू पुन्हा एकदा एकत्र आले. उद्धव आणि राज हे सहकुटुंब त्यांच्या चुलत बहीण जयजयवंती यांच्या घरी एकत्र आले होते.
ठाकरे बंधूंच्या भेटीगाठी वाढल्या असतानाच उद्धवसेना आणि मनसे पक्षाच्या युतीची घोषणा कधी जाहीर होणार याबाबत उत्सुकता आहे.
कधी आणि कुठे एकत्र ?
५ जुलै २०२५ - मराठी भाषा विजयी मेळाव्यात एकत्र
२७ जुलै - उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे मातोश्रीवर
२७ ऑगस्ट - गणेशोत्सवानिमित्त उद्धव ठाकरे सहकुटुंब राज यांच्या शिवतीर्थवर
१० सप्टेंबर - उद्धव ठाकरे हे संजय राऊत यांच्यासोबत राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी
५, १२ ऑक्टोबर - राज मातोश्रीवर
१७ ऑक्टोबर - मनसे दीपोत्सवाचे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन राज ठाकरेंच्या उपस्थितीत
२२ ऑक्टोबर - राज ठाकरे यांच्या आईंच्या वाढदिवसानिमित्त उद्धव ठाकरे शिवतीर्थ निवासस्थानी
२३ ऑक्टोबर - भाऊबीजेनिमित्त ठाकरे कुटुंब पुन्हा एकत्र