मुंबई : आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत उद्धवसेना व मनसे एकत्र निवडणूक लढण्याची चर्चा सुरू आहे. मात्र, त्यापूर्वीच मुंबईतील दि बेस्ट एम्प्लॉईज को. ऑप. क्रेडिट सोसायटीची निवडणूक दोन्ही पक्ष एकत्रित लढवीत आहेत.
सोसायटीच्या २१ जागांपैकी उद्धवसेना १९, तर मनसे २ जागा लढविणार असून, या निवडणुकीसाठी १८ ऑगस्टला मतदान होणार आहे. उद्धवसेनेची बेस्ट कामगार सेना व मनसेच्या बेस्ट कामगार सेनेने एकत्र येत सोसायटीच्या निवडणुकीसाठी उत्कर्ष पॅनल तयार केले आहे.
या पॅनलने सर्वसाधारण प्रवर्ग (१६), महिला राखीव (२), ओबीसी प्रवर्ग (१), एससीएसटी प्रवर्ग (१), व्हीजेएनटी (१) असे उमेदवार जाहीर केले आहेत.