मुंबईत पाऊस पुन्हा बरसला; अंधेरीत दगड कोसळले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2021 05:38 AM2021-07-23T05:38:50+5:302021-07-23T05:39:30+5:30

शहरासह उपनगरात मुसळधार पावसाने गुरुवारीही आपला मारा कायम ठेवला.

rained again in Mumbai the stones fell in the andheri | मुंबईत पाऊस पुन्हा बरसला; अंधेरीत दगड कोसळले

मुंबईत पाऊस पुन्हा बरसला; अंधेरीत दगड कोसळले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : शहरासह उपनगरात मुसळधार पावसाने गुरुवारीही आपला मारा कायम ठेवला. गुरुवारी मुंबईत सरासरी ७० मिलीमीटर पाऊस नोंदविण्यात आला असतानाच अंधेरी पूर्वे येथील मरोळमधल्या सैफी मंझिल को-ऑप. सोसायटी येथे डोंगरावरील काही दगड घसरत खाली आले. याची माहिती मिळताच आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या कार्यपद्धतीनुसार घटनास्थळी मदतकार्य रवाना करण्यात आले. सुदैवाने यात वित्त आणि जीवितहानी झाली नाही.

मुंबईत दिवसभर विश्रांती घेत पावसाचा मारा सुरू होता. गुरुवारी सकाळपासून मुंबई शहर आणि उपनगरात पावसाने पुन्हा एकदा जोर पकडला. उपनगरांत वाऱ्यासह पावसाच्या मोठ्या सरी कोसळत होत्या. दिवसभर मुंबईत ताशी ४६ ते ६० किलोमीटर वेगाने वारे वाहत होते. याच काळात बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाच्या सरी कोसळल्या. सहा ठिकाणी बांधकामाचा भाग कोसळला. दहा ठिकाणी शॉर्टसर्किट झाले. तीस ठिकाणांहून झाडे कोसळल्याच्या तक्रारी महापालिकेस प्राप्त झाल्या. बुधवारी दुपारी अंधेरी येथील तक्षशिला पोलीस चौकी येथे झाड पडून एक तरुण जखमी झाला.  त्याला कूपर रूग्णालयात दाखल करण्यात आले.

पाऊस मिमी : मुंबई शहर ७४, पश्चिम उपनगर ६०, पूर्व उपनगर ७१, महालक्ष्मी १४४, मानपाडा १३०, मुंब्रा १४५, कासार वडवली १२७, राममंदिर ९८, विक्रोळी ८७.
 

Web Title: rained again in Mumbai the stones fell in the andheri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app