Join us

Rain Update: गणपती बाप्पा घेऊन येणार धाे धाे पाऊस, दहा जिल्ह्यांना दाेन दिवस ऑरेंज अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2023 08:47 IST

Rain Update: राज्यातील १० जिल्ह्यांमध्ये शनिवारी व रविवारी हवामान विभागाने ‘ऑरेंज अलर्ट’ दिला असून, अमरावती जिल्ह्यात ‘रेड अलर्ट’ सांगितला आहे, तर वर्धा, नागपूर, औरंगाबाद, जालना तसेच नंदुरबार जिल्ह्यांत काही ठिकाणी ‘ऑरेंज अलर्ट’चा देण्यात आला आहे. 

मुंबई - राज्यातील १० जिल्ह्यांमध्ये शनिवारी व रविवारी हवामान विभागाने ‘ऑरेंज अलर्ट’ दिला असून, अमरावती जिल्ह्यात ‘रेड अलर्ट’ सांगितला आहे, तर वर्धा, नागपूर, औरंगाबाद, जालना तसेच नंदुरबार जिल्ह्यांत काही ठिकाणी ‘ऑरेंज अलर्ट’चा देण्यात आला आहे. उत्तर मराठवाडा, उत्तर पश्चिम विदर्भ येथे दोन दिवस पावसाची तीव्रता वाढणार आहे. कोकण, गोव्यात  १६ व १७ सप्टेंबरला  ‘ऑरेंज अलर्ट’ दिला आहे.  १८ सप्टेंबरपासून पावसाची तीव्रता कमी होईल. 

राज्यात १६ तारखेला काही भागांमध्ये हळूहळू पाऊस वाढण्याची शक्यता आहे. पुढील ४ ते ५ दिवस तीव्र पाऊस होईल. तसेच काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा आहे.- के. एस. होसळीकर, प्रमुख, भारतीय हवामानशास्त्र विभाग, पुणे

टॅग्स :पाऊसमहाराष्ट्र