Rain: एक नंबर : पावसाने ओलांडला तब्बल २ हजार मिमीचा टप्पा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2021 08:54 IST2021-08-04T08:53:19+5:302021-08-04T08:54:02+5:30
Rain in Mumbai: मुंबई शहर आणि उपनगराला मान्सूनने झोडपून काढले असून, जून आणि जुलै महिन्यात झालेल्या पावसाने २ हजार ८८ मिलिमीटरचा टप्पा ओलांडला आहे.

Rain: एक नंबर : पावसाने ओलांडला तब्बल २ हजार मिमीचा टप्पा
मुंबई : मुंबई शहर आणि उपनगराला मान्सूनने झोडपून काढले असून, जून आणि जुलै महिन्यात झालेल्या पावसाने २ हजार ८८ मिलिमीटरचा टप्पा ओलांडला आहे. मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, आजवर कुलाबा येथे १ हजार ५२० मिलिमीटर एवढ्या पावसाची नोंद झाली आहे.
येथील पावसाची वार्षिक सरासरी २ हजार २९५ मिमी आहे. या वर्षीच्या पावसाची टक्केवारी ६६ टक्के
आहे. सांताक्रूझ येथे २ हजार ८८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. येथील पावसाची वार्षिक सरासरी २ हजार ७०४ आहे. पावसाची टक्केवारी ७७ टक्के आहे. गेल्या वर्षी येथे ७१ टक्के एवढ्या पावसाची नोंद झाली होती.
मुंबईत पावसाने विश्रांती घेतली असली तरी मधूनच वेगवान वाऱ्यासह पाऊस कोसळत आहे. येत्या २४ तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. काही ठिकाणी ताशी ४० ते ६० किमी वेगाने वारे वाहतील, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.