जुलैची सरासरी कमी, गणपती बाप्पा पाऊस आणणार...; १५ ऑगस्टनंतर पावसाची शक्यता, अभ्यासकांचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2025 13:44 IST2025-08-03T13:44:22+5:302025-08-03T13:44:33+5:30

आता १५ ऑगस्टनंतर पुन्हा पाऊस पडणार असून,  ऐन गणेशोत्सावात आणखी जोर धरेल, असे त्यांनी पुढे सांगितले.

Rain July average is below average, Ganpati Bappa will bring rain Chance of rain after August 15, experts predict | जुलैची सरासरी कमी, गणपती बाप्पा पाऊस आणणार...; १५ ऑगस्टनंतर पावसाची शक्यता, अभ्यासकांचा अंदाज

जुलैची सरासरी कमी, गणपती बाप्पा पाऊस आणणार...; १५ ऑगस्टनंतर पावसाची शक्यता, अभ्यासकांचा अंदाज


मुंबई :  दरवर्षी जुलैमध्ये मुंबईत सरासरी ९२० मिमीहून अधिक पावसाची नोंद होते. मात्र, या वर्षी ७९७ मिमी पावसाची नोंद झाली असून, २०१५ नंतर आतापर्यंत प्रत्येक वर्षीच्या जुलैमध्ये पडलेल्या पावसाच्या तुलनेत या वर्षीही पावसाची नोंद कमी झाल्याचे हवामान अभ्यासकांनी सांगितले. आता १५ ऑगस्टनंतर पुन्हा पाऊस पडणार असून,  ऐन गणेशोत्सावात आणखी जोर धरेल, असे त्यांनी पुढे सांगितले.

 चार महिन्यांच्या मान्सून काळात तुलनेने जुलै आणि ऑगस्ट महिन्यात बऱ्यापैकी पावसाची नोंद होते. विशेषत: जुलै महिना सर्वाधिक पावसाचा म्हणून ओळखला जातो, परंतु गेल्या काही वर्षांत मुंबईतल्या पावसाचा पॅटर्न बदलत असून, सलग लागून राहणारा पाऊस केवळ तीन तासांत पडून जात आहेत. 

या वर्षीही जूनमध्ये सरासरी पावसाची नोंद झाल्यानंतर जुलैमध्ये बऱ्यापैकी पाऊस अपेक्षित होता. मात्र, जुलैचा तिसरा आठवडा वगळता मान्सूनला समाधानकारक कामगिरी करता आली नाही. 

श्रावण सरींचीही पाठ
गेल्या चार दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. श्रावण सरींनीही मुंबईकडे पाठ फिरविली आहे. गेल्या तीन दिवसांच्या तुलनेत शनिवारी किंचित उकाड्याचा जाणवत असल्याची प्रतिक्रिया मुंबईकरांनी दिली.

जुलैमध्ये सरासरी मुंबईत ९०० मिमीहून अधिक पाऊस पडतो. मात्र, यंदा ७९७ मिमी नोंद झाली आहे. तुलनेने नवी मुंबईत अधिक पाऊस झाला असून, ९०० हून अधिक नोंद झाली आहे. १५ ऑगस्टपर्यंत तुलनेने कमी पाऊस होईल, नंतर गडगटांसह पाऊस पडेल. 
श्री गणेशोत्सवात चांगल्या पावसाची शक्यता आहे. सप्टेंबरमध्ये सरासरी पाऊस असेल.
अथ्रेय शेट्टी, हवामान अभ्यासक


जुलै २०२५ किती बरसला ?
मुंबई    ७९७ 
चेंबूर    ८२६ 
बीकेसी    ७६० 
माटुंगा    ७४१ 
कुलाबा    ३८१ 
पवई    ९२७ 
मुलुंड    ८८३ 

जुलै २०२४ मधील नोंद
पवई    २,४०० 
परळ    २,१२७ 
सांताक्रुझ    १,७०३ 
दहिसर    १,५९७ 
कुलाबा    १,४०२ 
 

Web Title: Rain July average is below average, Ganpati Bappa will bring rain Chance of rain after August 15, experts predict

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.