मुंबईत आजपासून दिवसाही पाऊस
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 13:28 IST2025-10-29T13:28:04+5:302025-10-29T13:28:04+5:30
अरबी समुद्रातील तीव्र कमी दाबाचे क्षेत्र जसजसे गुजरातकडे सरकत आहे, तसतसा पावसाचा जोर वाढणार आहे.

मुंबईत आजपासून दिवसाही पाऊस
मुंबई : दिवाळी सरल्यानंतरही पावसाचा मुक्काम कायम असल्याने मुंबईकर त्रस्त झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून रोज सायंकाळी, रात्री पावसाच्या सरी कोसळत आहेत. मंगळवारी सायंकाळी ५ दरम्यान पडलेल्या पावसाने नागरिकांना भिजवून टाकले. अरबी समुद्रातील तीव्र कमी दाबाचे क्षेत्र जसजसे गुजरातकडे सरकत आहे, तसतसा पावसाचा जोर वाढणार आहे. त्यामुळे बुधवार आणि गुरुवारी मुंबईत दिवसभर अवेळी पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. दरम्यान, मंगळवारी दुपारी ४ वाजल्यापासूनच आकाशात ढग दाटून येण्यास सुरुवात रुवात झाली. त्यामुळे सायंकाळी ६ वाजताच रात्र झाल्याचे चित्र होते. सायंकाळी पडलेल्या पावसामुळे मुंबईकरांसह कामावरून घरी परतणाऱ्या नोकरदारांची गैरसोय झाली.