दुरुस्तीच्या कामासाठी रेल्वेचा मेगाब्लॉक; तिन्ही मार्गांवर रविवारी होणार ‘प्रवासखोळंबा’
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 06:08 IST2025-09-27T06:08:09+5:302025-09-27T06:08:09+5:30
दर रविवारी सुट्टीच्या दिवशी रेल्वेकडून मेगाब्लॉक घेऊन रखडलेली कामे अथवा दुरुस्ती करण्यात येते.

दुरुस्तीच्या कामासाठी रेल्वेचा मेगाब्लॉक; तिन्ही मार्गांवर रविवारी होणार ‘प्रवासखोळंबा’
मुंबई - दुरुस्ती आणि अन्य कामांसाठी तिन्ही उपनगरीय रेल्वे मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर विद्याविहार आणि ठाणे स्थानकांदरम्यान पाच आणि सहाव्या मार्गिकांवर तसेच ठाणे आणि वाशी /नेरूळ स्थानकांदरम्यान अप आणि डाउन ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे, तर पश्चिम रेल्वेवर चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल दरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा होणार आहे.
मध्य रेल्वे
विद्याविहार आणि ठाणे दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गावर सकाळी ८ ते दुपारी १ पर्यंत
परिणाम : १४ मेल / एक्स्प्रेस जलद मार्गावर. त्या १० ते १५ मिनिटांच्या उशिराने धावतील.
ट्रान्स हार्बर
ठाणे आणि वाशी / नेरूळ दरम्यान अप व डाउन ट्रान्स-हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० पर्यंत
परिणाम : वाशी / नेरूळ आणि ठाणे दरम्यान ट्रान्स-हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.
पश्चिम रेल्वे
चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ पर्यंत
परिणाम : अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील सेवा जलद मार्गावर वळविणार.