Join us

फुकट्यांवरील कारवाईसाठी रेल्वेची ५५ टीसींची फौज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 15:15 IST

मध्य रेल्वेकडून सकाळच्या सत्रात ३३ हजारांचा दंड वसूल

मुंबई: मध्य रेल्वेने फर्स्ट क्लास डब्यात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी विशेष तिकीट तपासणी मोहीम राबविली. दरम्यान, सकाळच्या सत्रात केवळ ९ गाड्यांमधून एकूण १६१ प्रवाशांना पकडले. त्यांच्याकडून ३३ हजार ५०० रुपये दंड वसूल केला.

मुंब्रा घटनेनंतर लोकलमधील गर्दी रोखण्यासाठी मध्य रेल्वेच्यामुंबई विभागाने सकाळी गर्दीच्या वेळेत लोकलमधील विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आळा घालण्यासाठी मुख्य मार्गावरील टिटवाळा-दादर, हार्बर मार्गावर पनवेल ते कुर्ला आणि ट्रान्सहार्बरवरील ठाणे-पनवेल लोकलमधील सर्वाधिक विनातिकीट प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे. या मोहिमेसाठी 99 तिकीट तपासणीसांसह सात रेल्वे सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांची विविध पथकांमध्ये विभागणी करण्यात आली. सकाळी गर्दीच्या वेळेत ९ लोकलची सखोल तपासणी करण्यात आली.

अशी करण्यात आली प्रवाशांवर कारवाईटिटवाळा-दादरमध्ये विनातिकीट १३ प्रवाशांवर, ठाणे-पनवेल लोकलमध्ये २४, पनवेल-कुर्ला लोकलमध्ये ३२ प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. प्रवाशांनी तिकीट-पास घेऊनच शिस्तीने प्रवास करावा. प्रवाशांच्या तक्रारींचे तातडीने निवारण करण्यासाठी मुंबई विभागाकडून नियमितपणे हा उपक्रम सुरू ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

मोहिमेचा परिणाम- गाड्यांची तपासणी करण्यात आल्याने त्या गाड्यांमधील प्रथम श्रेणीत कमीत कमी प्रवासी आढळून आले. गाडीत टीसी असल्याचे पाहून अनेक विनातिकीट प्रवाशांनी डब्यांमध्ये प्रवेश केला नाही.- केवळ शेवटची तारीख उलटलेले २ पासधारक प्रवासी प्रवासात विनातिकीट म्हणून सापडले. त्यांच्यावर जागेवरच दंड आकारण्यात आला.- प्रथम श्रेणीतील गर्दी 3 रोखण्यासाठी सुरू केलेल्या उपक्रमाचे प्रवाशांनी कौतुक केले. उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला, असे तिकीट तपासणीसांनी सांगितले.

१०६ प्रवासी विनातिकीटयावेळी प्रथम श्रेणीतून एकूण १०६ विनातिकीट प्रवाशांकडून ३३,५७५ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. सायंकाळी गर्दीच्या वेळेत ही अशीच तपासणी सुरू राहणार आहे.

टॅग्स :रेल्वेमुंबईमहाराष्ट्र