२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 05:52 IST2025-11-07T05:52:02+5:302025-11-07T05:52:46+5:30

ऐन गर्दीच्या वेळेला सीएसएमटीवर मारला ठिय्या, मोटरमन अडकले; लोकल सेवा तासभर ठप्प, सॅण्डहर्स्ट रोडला रूळ ओलांडताना ५ जणांना लोकलने उडविले, अपघाता दोन गंभीर जखमी

Railway employees' protest to save 2 engineers claimed the lives of 2 innocent passengers | २ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी

२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: 'व्हिजेटीआय'ने दिलेल्या अहवालात रेल्वेच्या दोन अभियंत्यांना दोषी ठरवण्यात आले. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. याचा राग धरून रेल्वे कर्मचारी संघटनांनी गुरुवारी ऐन गर्दीच्या वेळी लोकल सेता बंद करत आंदोलन छेडले. लोकल ठप्प झाल्यामुळे संतप्त प्रवाशांनी सीएसएमटीकडे जाणारी लोकल पकडण्यासाठी रेल्वे रुळाचा मार्ग स्वीकारला. त्याचवेळी समोरून आलेल्या लीकलने पाच प्रवाशांना उढवले. यात दोघांचा बळी गेला. या घटनेमुळे लोकल प्रवासी प्रचंड संतप्त झाले आहेत.

रेल्वे कर्मचारी संघटनांनी गुरुवारी दुपारी ३ नंतर सीएसएमटी स्थानकात आदोलन छेडल्याने गर्दीच्या वेळी लोकल सेवा तासभर ठप्प झाली सैण्डहर्स्ट रोड स्टेशनवर कल्याणला जाणारी लोकल बराच वेळ उभी होती. त्यामुळे अनेकांनी पुन्हा सीएसएमटीकडे जाणारी लोकल पकडण्यासाठी रेल्वे रूळ ओलांडण्यास सुरुवात केली. त्याचवेळी सीएसएमटीकडे आणाऱ्या जलद लोकलने पाच प्रवाशांना उडविले. स्थात एका १९ तर्षीय तरुणीसह दोघांचा मृत्यू झाला. इतर दोघे गंभीर जखमी झाले असून, एकास किरकोळ दुखापत झाली आहे. एक प्रवासी बेशुद्ध अवस्थेत असून, दुसऱ्या प्रवाशाचा खांदा निखळला आहे. तसेच डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे जे जे रुग्णालय प्रशासनाने सांगितले.

कर्मचाऱ्यांनी मोटरमन कक्षाबाहेरच आंदोलन सुरु केल्याने मोटरमन आतच अडकले. त्यामुळे संध्याकाळी ५:५० ते ६:४४ या कालावधीत लोकल स्टेशनवरच थांबल्या. वामूळे परी परतणाऱ्या हजारो प्रवाशांचा खोळंबा झाला. तासाभराने लोकल पकढण्यासाठी प्रवाशांचा गोंधळ उडाला, त्याचवेळी सॅण्डहर्स्ट रोड स्टेशनवर सीएसएमटीला जाणारी लोकल बराच वेळ थांबली होती. त्यामुळे काही प्रवासी त्या लोकलमध्ये बसण्यासाठी उतरल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. कल्याणला जाणारी लोकल सॅण्डहर्स्ट रोड स्टेशनतर आल्यावर काही प्रवाशांनी सीएसएमटी दिशेची लोकल पकडण्यासाठी रूळ ओलांडला. मुंब्रा अपघातामध्ये रेल्वेच्या दोन अभियंत्यांना दोषी ठरतून लोहमार्ग पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. त्याविरोधात सेंट्रल रेल्वे मजदूर संघ, नैशनल रेल्वे मजदूर यूनियन, इंटक आदी संघटनांनी है आंदोलन केले.

मुलीचा मृत्यू, आई जखमी

एका मृताची ओळख पटलेली नाही. हेली मोहमाया (वय १९) हिचाही या दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला. तिची आई खुशबू मोहमाया (वय ४५) या गंभीर जखमी झाल्या आहेत. याफिजा चोगले (वय ६२) या सुद्धा गंभीर जखमी झाल्या आहेत, तर कैफ चोगले यास किरकोळ दुखापत झाली.

आंदोलनामुळे मध्य रेल्वेच्या ३० लोकल रद्द

मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे गर्दीच्या वेळेत ६० लोकल फेऱ्यांवर परिणाम झाला. यात ३० लोकल रद्द करण्यात आल्या असून ३० हून अधिक लोकल अर्धा तास विलंबाने धावत्या होत्या. तसेच आंदोलकांनी रेल्वे रुळांवर जाऊ नये यासाठी रेल्वे सुरक्षा दल आणि रेल्वे पोलिस यांची सुरक्षा होती. दरम्यान रात्री उशिरापर्यंत अप आणि डाउन लोकल ४० ते ५० मिनिटांच्या विलंबाने धावत होत्या.

ज्यांच्या पैशांवर रेल्वे चालते, त्यांच्या जिवाशी का खेळता?

ज्या प्रवाशांच्या पैशांवर रेल्वे सेवा चालते, त्यांच्याच जिवाशी खेळणाऱ्या रेल्वे प्रशासन आणि कर्मचाऱ्यांच्या कृत्यांचा निषेध आहे, अशा शब्दांत मुंबई रेल्वे प्रवासी संघाने गुरुवारी निषेध केला आहे. आंदोलन थांबवावे, न्यायालयीन प्रक्रिया अडथळ्याविना सुरू राहावी आणि प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वाधिक प्राधान्य द्यावे, अशी मागणी संघाने केली.

मुंब्रा रेल्वे दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या आणि जखमी झालेल्या प्रवाशांना न्याय मिळावा म्हणून महाराष्ट्र रेल्वे पोलिसांनी तपास करून अहवाल तयार केला. या तपासासाठी त्यांनी व्हीजेटीआय या संस्थेच्या मदतीने घटनास्थळाचे विश्लेषण करून निष्कर्ष सादर केले. या प्रकरणावर सध्या न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. अशा टप्प्यावर रेल्वे कर्मचारी संघटनांनी न्यायालयीन कारवाईत अडथळे निर्माण करण्याच्या उद्देशाने प्रवाशांना वेठीस धरणे तसेच अतिगर्दीच्या वेळी रेल्वेस्थानकांवर आंदोलन करणे, हे कायद्याने गुन्हा असून, मानवीदृष्ट्याही अमानवीय आहे, असे मुंबई रेल्वे प्रवासी संघाचे म्हणणे आहे. दरम्यान, मुंब्रा इथे झालेल्या अपघातात लोहमार्ग पोलिसांनी २ अभियंत्यांवर गुन्हे दाखल केले. त्याच्या विरोधात रेल्वे कर्मचारी संघटनेने सीएसएमटी येथे आंदोलन केले. याचा फटका प्रवाशांना बसला.

रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा प्रवासी संघटनेकडून निषेध

डोंबिवली: रेल्वे कर्मचारी संघटना यांनी दोषी अधिकाऱ्यांची बाजू घेऊन मुंब्रा अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांच्या जिवाची किंमत गौण ठरवली आहे. ठाणे रेल्वे पोलिसांनी नोंदविलेला गुन्हा हा योग्य पद्धतीने तपासाअंती व व्हीजेटीआयसारख्या नामांकित संस्थेच्या अहवालानुसार आहे. मग, रेल्वे कर्मचारी संघटना यांनी आंदोलन करून दबावतंत्राचा वापर करणे अत्यंत चुकीचे आहे. त्याकरिता उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संस्था अशा आंदोलनाचा तीव्र शब्दांत निषेध करीत असल्याचे रेल्वे प्रवासी संघटनेने म्हटले आहे. या प्रकरणाची पुढील चौकशी निष्पक्ष होण्यासाठी निवृत्त न्यायाधीश यांची समिती स्थापन करावी, अशी मागणी करण्यात येत असल्याची माहिती संघटनेच्या अध्यक्षा लता अरगडे यांनी दिली.

Web Title : इंजीनियरों को बचाने के लिए रेल कर्मचारियों के विरोध में दो यात्रियों की मौत

Web Summary : रेलवे कर्मचारियों ने इंजीनियरों के खिलाफ आरोप के विरोध में लोकल ट्रेनें रोकीं। निराश यात्रियों ने ट्रैक पार किया; तेज रफ्तार ट्रेन ने दो को मार डाला, अन्य घायल। यात्रियों की सुरक्षा से ऊपर आरोपियों को प्राथमिकता देने पर यूनियनों की निंदा। यात्रियों ने जवाबदेही की मांग की।

Web Title : Rail staff protest to save engineers kills two innocent passengers.

Web Summary : Rail staff protested against engineers' indictment, halting local trains. Frustrated passengers crossed tracks; a speeding train killed two, injured others. Unions face condemnation for prioritizing accused over passenger safety. Commuters demand accountability.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.