रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना कोरोनासह आता डेंग्यूची भीती, कार्यशाळेत डेंग्यूच्या अळ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2020 10:00 PM2020-07-11T22:00:25+5:302020-07-11T22:00:35+5:30

मुंबई महानगरपालिकेने लोअर परळ कार्यशाळेमध्ये सुरूवातीला १० टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीतच सुरू करण्याची परवानगी दिली होती

Railway employees now fear dengue, including corona, dengue larvae in the workshop | रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना कोरोनासह आता डेंग्यूची भीती, कार्यशाळेत डेंग्यूच्या अळ्या

रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना कोरोनासह आता डेंग्यूची भीती, कार्यशाळेत डेंग्यूच्या अळ्या

googlenewsNext

मुंबई :  पश्चिम रेल्वेच्या लोअर परळ कार्यशाळेत डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्या आहेत. त्यामुळे आता रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना कोरोनासह डेंग्यूची भीती वाटू लागली आहे. कार्यशाळेत डेंग्यूच्या अळ्या असलेला व्हिडीओ मागील दोन दिवसांपासून समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
पश्चिम रेल्वे मार्गावरील लोअर परळ कार्यशाळेत अनेक ठिकाणी डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्या आहे. रेल्वे इंजिनचे काम करत असलेल्या ठिकाणीच अळ्या या आहेत.  कोरोनासह आता कार्यशाळेतील डेंग्यूचे संकट आले असल्याची प्रतिक्रिया येथील कर्मचाऱ्यांनी दिली.

मुंबई महानगरपालिकेने लोअर परळ कार्यशाळेमध्ये सुरूवातीला १० टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीतच सुरू करण्याची परवानगी दिली होती. त्यानंतर ३० टक्के कर्मचाऱ्यांना परवानगी देण्यात आली आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झपाट्याने होत आहे. यात कार्यशाळेत अनेक ठिकाणी सांडपाण्यात अळ्या दिसून येत आहे. त्यामुळे दैनंदिन कामे कशी करायची, अशी भीती कर्मचाऱ्यांना सतावत आहे.  मागील दोन दिवसांपासून कार्यशाळेत अळ्या दिसून येत आहेत, अशी माहिती कर्मचाऱ्यांनी दिली.

Web Title: Railway employees now fear dengue, including corona, dengue larvae in the workshop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.