Raid on a municipal contractor; Shivsena leader are on radar of income tax department ? | महापालिका कंत्राटदारांवर छापे; आयकर विभागाच्या रडारवर सेनेचे नेते ?
महापालिका कंत्राटदारांवर छापे; आयकर विभागाच्या रडारवर सेनेचे नेते ?

ठळक मुद्दे मिळालेल्या माहितीच्या आधारावर महापालिकेशी संबंधित या नेत्यांकडे चौकशी केली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.या नेत्यांकडेही आवश्यकता भासल्यास चौकशी केली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.

मुंबई - महायुतीतील बिघाडी आणि राज्यात सत्ता स्थापण्यासाठी शिवसेना आणि काँग्रेस आघाडीच्या निर्णायक हालचाली सुरु असताना आयकर विभागाने मुंबई महापालिकेतील सुमारे ३७ खासगी ठेकेदारांवर छापे टाकले आहेत. त्यांच्या तपासणीत कोट्यावधीची बेहिशेबी व्यवहार उघडकीस आले असल्याचे समजते. आता शिवसेनेतील मुंबईतील काही बडे नेते या विभागाच्या रडारवर असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. ठेकेदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर महापालिकेशी संबंधित या नेत्यांकडे चौकशी केली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

विधानसभा निवडणूकीचा निकाल उलटून चार आठवडे होत आले तरी अद्याप राज्यातील सत्ता नाट्य संपलेले नाही. महायुतीतील महत्वाचा घटक असलेल्या शिवसेनेने मुख्यमंत्री पदावर दावा सांगत भाजपापासून फारकत घेतल्याने या दोन्ही पक्षामध्ये तणावाचे वातावरण आहे. त्या पाश्वभूमीवर गेल्या पाच दिवसापासून आयकर विभागाकडून महापालिकेशी संबंधित खासगी ठेकेदारावर छापे सत्र सुरु आहेत. मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील ३७ बडे ठेकेदार, तसेच राज्यातील काही एन्ट्री ऑपरेटरचे कार्यालये व निवासस्थानाची झडती घेण्यात आलेली आहे. त्यांच्याकडून सुमारे ७३५ कोटीच्या बोगस एन्ट्री व खर्चाच्या बनावट पावत्या मिळाल्याचे समजते. महापालिकेच्या विविध प्रकल्पासाठी जाहीर मंजूर करण्यात आलेल्या निधीचा उल्लेख असल्याचे समजते. त्यामुळे संबंधित ठेकेदारांकडून त्याबाबत खुलासा मागण्यात आलेला आहे. तसेच त्यांच्या या व्यवहाराशी संबंधित मुंबईतील सेनेचे नेते असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे या नेत्यांकडेही आवश्यकता भासल्यास चौकशी केली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.

 

Web Title: Raid on a municipal contractor; Shivsena leader are on radar of income tax department ?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.