Join us  

‘मोदी’ चित्रपट राहुल गांधी यांनाही आवडेल - विवेक ओबेरॉय

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2019 5:42 AM

विवेक ओबेरॉय : सिनेमा भक्तांसाठी नाही, तर देशभक्तांसाठी बनवलाय

मुंबई : पीएम नरेंद्र मोदी आत्मचरित्रपट काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनादेखील आवडेल; कारण ते देशभक्त आहेत. मी चित्रपट भक्तांसाठी नाही, तर देशभक्तांसाठी बनवला आहे, असे अभिनेता विवेक ओबेरॉय एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान म्हणाला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित आत्मचरित्रपट येत्या शुक्रवारी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात मोदींच्या भूमिकेत अभिनेता विवेक ओबेरॉय दिसणार आहे. हा चित्रपट सुरुवातीपासून राजकीय वादाच्या भोवऱ्यात अडकला. काही राजकीय पक्षांनी हा चित्रपट निवडणूक संपल्यानंतर प्रदर्शित करण्याची मागणी केली आहे. मात्र न्यायालय व निवडणूक आयोगाने या चित्रपटाच्या प्रदर्शनाला हिरवा कंदील दिला आहे. विवेक म्हणाला, चित्रपट कधी प्रदर्शित करायचा मला कोणी सांगू शकत नाही. ही तर हुकूमशाही आहे. आपण लोकशाहीत राहतो. इथे तुमच्या बापाचे नाव नाही, तर तुमचे काम चालणार, अशी खोचक टिप्पणीही विवेकने या वेळी केली.पीएम नरेंद्र मोदी या आत्मचरित्रपटाचे दिग्दर्शन ओमंग कुमारने केले आहे. या चित्रपटाची निर्मिती सुरेश ओबेरॉय, आनंद पंडित, संदीप सिंग व आचार्य मनीष यांनी केली आहे.

टॅग्स :विवेक ऑबेरॉयनरेंद्र मोदीराहुल गांधीपी. एम. नरेंद्र मोदी