Rafale Deal Controversy: राफेल घोटाळा हाच भाजपाच्या भ्रष्टाचाराचा पुरावा - रणदीप सूरजेवाला
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2018 05:46 IST2018-09-28T05:45:38+5:302018-09-28T05:46:07+5:30
केंद्रातील मोदी सरकार खोटारडे आहे, चौकीदार भ्रष्टाचारात भागीदार झाला आहे, राफेल घोटाळा हा भाजपाच्या भ्रष्टाचारी कारभाराचा स्पष्ट पुरावा आहे, आता हे सरकार उलथवण्याची वेळ आली आहे,

Rafale Deal Controversy: राफेल घोटाळा हाच भाजपाच्या भ्रष्टाचाराचा पुरावा - रणदीप सूरजेवाला
मुंबई : केंद्रातील मोदी सरकार खोटारडे आहे, चौकीदार भ्रष्टाचारात भागीदार झाला आहे, राफेल घोटाळा हा भाजपाच्या भ्रष्टाचारी कारभाराचा स्पष्ट पुरावा आहे, आता हे सरकार उलथवण्याची वेळ आली आहे,
असा हल्लाबोल काँग्रेसचे राष्टÑीय प्रवक्ते रणदीप सूरजेवाला यांनी केला.
युवक काँग्रेसच्या राज्य कार्यकारिणीच्या गुरुवारी झालेल्या निर्धार बैठकीत ते बोलत होते. सूरजेवाला म्हणाले, तरुणांच्या बेरोजगारीवर सरकारमधील कोणीही बोलायला तयार नाही. युवकांचा आवाज बनून काम करण्याची मोठी जबाबदारी युवक काँग्रेसवर येऊन ठेपली आहे. महाराष्ट्रात
युवक काँग्रेसच्या आंदोलनांनी फडणवीस सरकारची झोप उडाली पाहिजे. तुम्हाला बळ देण्याचे काम राहुलजी नक्की करतील,’ याची खात्री सूरजेवाला यांनी या वेळी दिली.
या वेळी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, युवक अध्यक्ष सत्यजीत तांबे, राधाकृष्ण विखे, बाळासाहेब थोरात, राजीव सताव, उल्हास पवार, केशव चंद यादव, कृष्णा अल्लावरू, यशोमती ठाकूर, अमित देशमुख, विश्वजीत कदम आदींची भाषणे झाली.