Join us  

नैराश्यग्रस्त विरोधक नाहीत, तर सरकारच निराशेनं ग्रासलेलंय -  राधाकृष्ण विखे-पाटील  

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2018 11:08 AM

नैराश्यग्रस्त विरोधक नाहीत, तर सरकारच निराशेनं ग्रासलेलं आहे. - राधाकृष्ण विखे-पाटील

मुंबई -  गेल्या आठवड्यात काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेऊन अनुसूचित जाती-जमाती, अल्पसंख्यांक,महिला आणि बेरोजगारांना न्याय देण्यासंदर्भात सरकारची ठाम भूमिका आजच्या अभिभाषणामध्ये स्पष्ट करावी,अशी मागणी केली होती. राज्यातील सर्व समाजघटकांना न्याय देण्याबाबत आम्ही केलेल्या मागणीला सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा संपूर्ण महाराष्ट्राला आहे.मुख्यमंत्र्यांच्या विधानाला प्रत्युत्तरविरोधक वैफल्यग्रस्त असल्याचे विधान काल मुख्यमंत्र्यांनी केले. पण मला त्यांना इतकेच सांगायचे आहे की,नैराश्यग्रस्त विरोधक नाहीत, तर सरकारच निराशेनं ग्रासलेलं आहे. सरकारचं कर्तृत्व शून्य आहे. अधिवेशनात विरोधी पक्ष आपल्याला घेरणार याची जाणीव असल्यामुळे त्यांनी बरोबर अधिवेशनाच्या दोन दिवस अगोदर बोंडअळी व तुडतुडाग्रस्त शेतकऱ्यांना मदत निर्गमित करण्याचा आदेश काढला.आपल्याला आठवत असेल गेल्या हिवाळी अधिवेशनाच्या दोन दिवस अगोदर शनिवार-रविवार बँका उघड्या ठेवून यांनी कर्जमाफीचे पैसे वितरीत करायला सुरूवात केली होती. ऐन अधिवेशनाच्या अगोदर सरकारला असे निर्णय घ्यावे लागतात, यावरून घाबरलेलं कोण आहे? हतबल कोण आहे? याची जाणीव होते. 

टॅग्स :राधाकृष्ण विखे पाटीलभाजपाकाँग्रेस