‘रमाकांत आचरेकर यांचा शिवाजी पार्कवर पुतळा उभारावा’

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2019 01:06 IST2019-01-05T01:05:48+5:302019-01-05T01:06:07+5:30

जागतिक कीर्तीचे खेळाडू घडविणारे प्रसिद्ध क्रिकेट प्रशिक्षक पद्मश्री रमाकांत आचरेकर यांचा पुतळा शिवाजी पार्कवर उभारण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव यांनी पालिका प्रशासनाकडे पत्राद्वारे केली आहे.

 Raamakant Achrekar should set up statue at Shivaji Park | ‘रमाकांत आचरेकर यांचा शिवाजी पार्कवर पुतळा उभारावा’

‘रमाकांत आचरेकर यांचा शिवाजी पार्कवर पुतळा उभारावा’

मुंबई : जागतिक कीर्तीचे खेळाडू घडविणारे प्रसिद्ध क्रिकेट प्रशिक्षक पद्मश्री रमाकांत आचरेकर यांचा पुतळा शिवाजी पार्कवर उभारण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव यांनी पालिका प्रशासनाकडे पत्राद्वारे केली आहे.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला घडविण्यात आचरेकर सरांचे मोठे योगदान आहे. जागतिक कीर्तीचे अनेक खेळाडू त्यांनी घडविले. मुंबईला क्रिकेटची पंढरी समजली जाते. तर शिवाजी पार्क हे खेळाडूंसाठी चंद्रभागाप्रमाणे आहे. या मैदानात आचरेकर सरांनी अनेक खेळाडूंना मार्गदर्शन केले. क्रिकेट म्हटले की आचरेकर सरांचे नाव घेतले जाते. त्यामुळे त्यांची स्मृती चिरंतन राहण्यासाठी शिवाजी पार्कवर त्यांचा पुतळा उभारण्याची मागणी राष्ट्रवादीच्या गटनेत्या राखी जाधव यांनी केली आहे. राजा बढे चौक येथून शिवाजी पार्कच्या दिशेने जात असलेल्या प्रवेशद्वारावर आचरेकर सरांचा पुतळा उभारावा, अशी सूचना त्यांनी केली आहे.

Web Title:  Raamakant Achrekar should set up statue at Shivaji Park