वेसावे यारी रोड येथे आरोग्य तपासणीसाठी लागल्या पहाटेपासून रांगा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2020 18:19 IST2020-05-06T18:19:22+5:302020-05-06T18:19:45+5:30
परराज्यातील मजुरांची त्यांच्या मूळ गावी रवानगी करण्यापूर्वी त्यांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे.

वेसावे यारी रोड येथे आरोग्य तपासणीसाठी लागल्या पहाटेपासून रांगा
मुंबई : परराज्यातील मजुरांची त्यांच्या मूळ गावी रवानगी करण्यापूर्वी त्यांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. वर्सोवा यारी रोड येथील चिल्ड्रन वेल्फेअर शाळेत आयोजित आरोग्य तपासणी केंद्रात दाखला मिळण्यासाठी या भागातील मजुरांनी गेली तीन दिवस पहाटे पासून लांबच लांब रांगा लावल्या होत्या.या शाळेचे प्राचार्य व समाजसेवक अजय कौल यांनी या आरोग्य तपासणीसाठी पुढाकार घेऊन त्यांच्या शाळेचा हॉल उपलब्ध करून दिला होता.
विशेष म्हणजे सोशल डिस्टनसिंग पाळत व कुठे गोंधळ व गडबड न करता मजुरांना आरोग्य तपासणी करून या केंद्रातील डॉक्टरांनी त्यांना परगावी जाण्यासाठी फिट असल्याचे प्रमाणपत्र देण्यात आल्याची माहिती प्राचार्य कौल यांनी दिली.
यावेळी चार डॉक्टरांनी गेल्या तीन दिवसात सकाळी १० ते सायंकाळी ७ यावेळेत सुमारे 3000 मजुरांची तपासणी करून त्यांना त्यांच्या परगावी जाण्यासाठी फिट असल्याचे प्रमाणपत्र दिले अशी माहिती या शाळेचे ऍक्टिव्हिटी चेअरमन प्रशांत काशीद यांनी लोकमतला ही माहिती दिली.विशेष म्हणजे येथील २० विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला.बिहार,उत्तरप्रदेश,राजस्थान,कोलकत्ता येथील मजुरांची संख्या जास्त होती असल्याने येथे प्रमाणपत्र घेण्यासाठी गर्दी होत असल्याचे काशीद यांनी शेवटी सांगितले.