मुंबईत बाहेरून येणाऱ्या मेल, एक्स्प्रेसच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2019 04:26 AM2019-06-07T04:26:26+5:302019-06-07T04:26:51+5:30

प्रवाशांच्या सामानाची तपासणी होणे गरजेचे; शालीमार एक्स्प्रेसमधील धमकीच्या पत्रानंतर रेल यात्री परिषदेची मागणी

Question coming out from outside the mail, Express security in Mumbai | मुंबईत बाहेरून येणाऱ्या मेल, एक्स्प्रेसच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

मुंबईत बाहेरून येणाऱ्या मेल, एक्स्प्रेसच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

Next

मुंबई : लोकमान्य टिळक टर्मिनस येथे थांबा घेतलेल्या शालीमार एक्स्प्रेसमध्ये बुधवारी बॉम्बसदृश्य वस्तू आढळल्याने सुरक्षा विभागाने सुरक्षा व्यवस्थेला बळकटी दिली आहे. मात्र बाहेरील राज्यांतून मुंबईत दाखल होणाºया मेल, एक्स्प्रेसमुळे मुंबईला धोका निर्माण होण्याची भीती प्रवाशांमध्ये आहे.

मुंबईत उत्तर भारतातून दाखल होणाºया मेल, एक्स्प्रेसमधून जास्त धोका असल्याचे धमकीच्या पत्रावरून दिसून येते. धमकीच्या पत्रात मध्य प्रदेशचा उल्लेख आहे. ‘चार जणांनी सांगण्यात आलेल्या तारखेला आणि वेळेला बॉम्ब ठेवला आहे. बॉम्ब कुठे लावला आहे, याची पुसटशी कल्पना कोणालाही नाही. काम झाल्यानंतर आमची माणसे मध्य प्रदेशला रवाना होणार आहेत.’ असा उल्लेख पत्रात आहे. त्यामुळे मेल, एक्स्प्रेसमुळे मुंबईला जास्त धोका असल्याची भीती आहे.

मुंबई उपनगरीय लोकलच्या १ हजार ७७२ फेºया दररोज होतात. तर सीएसएमटी, लोकमान्य टिळक टर्मिनस आणि दादर या ठिकाणी दररोज ४०० मेल, एक्स्प्रेसच्या फेºया होतात. या फेऱ्यांमध्ये जास्त संख्येने उत्तर भारतातून मेल, एक्स्प्रेस येतात. मुंबईतील सुरक्षा, प्रवाशांच्या सामानाची तपासणी केली जाते. मात्र मुंबईतील सीएसएमटी, लोकमान्य टिळक टर्मिनस, दादर येथे थांबणाºया मेल, एक्स्प्रेसमधील प्रवाशांची आणि सामानाची तपासणी होत नाही. त्यामुळे बाहेरील राज्यांतून येणारे समाजकंटक कोणत्याही अडथळ्याविना मुंबईत दाखल होऊ शकतात. याचेच प्रत्यंतर बुधवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथे थांबा घेतलेल्या शालीमार एक्स्प्रेसमध्ये आढळून आलेल्या बॉम्बसदृश्य वस्तूमुळे आले आहे. त्यामुळे सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट करण्याची गरज प्रवाशांसह रेल यात्री परिषदेनेही व्यक्त केली आहे.

दरम्यान, लोकमान्य टिळक टर्मिनस येथे थांबा घेतलेल्या शालीमार एक्स्प्रेसमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू आढळल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे मुंबईतील प्रत्येक स्थानकावर सुरक्षेला प्राधान्य देण्यात आले आहे. सीएसएमटी, लोकमान्य टिळक, दादर अशा महत्त्वाच्या स्थानकांवरील सुरक्षा वाढविण्यात आली आहे, अशी माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाºयांनी दिली.

अंतर्गत सुरक्षेला धोका
मुंबईमध्ये बाहेरील राज्यांतून आणि परदेशातून अनेक पर्यटक सीएसएमटी स्थानकात दाखल होतात. हे पर्यटक खुलेआमपणे सीएसएमटी स्थानकाच्या प्रत्येक कानाकोपºयाचे, लोकल थांब्याचे, अंतर्गत सुरक्षेचे फोटो काढतात. त्यामुळे असे फोटो काढल्याने सीएसएमटी स्थानकाच्या अंतर्गत सुरक्षेला धोका निर्माण होण्याची भीती प्रवाशांनी व्यक्त केली आहे.

सुरक्षारक्षकांची संख्या वाढवा
मुंबई विभागात दाखल होणाºया प्रत्येक मेल, एक्स्प्रेसची कडक तपासणी होणे आवश्यक आहे. मेल, एक्स्प्रेसमध्ये तैनात करण्यात आलेल्या सुरक्षारक्षकांची संख्या वाढविली पाहिजे. जेणेकरून सुरक्षेला बळकटी येईल. - सुभाष गुप्ता, अध्यक्ष, रेल यात्री परिषद

Web Title: Question coming out from outside the mail, Express security in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.