Join us

रिलायन्स डिजिटलवर खरेदी; मिळवा १० हजार डिस्काउंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2022 10:04 IST

इलेक्ट्रॉनिक उपकरणांवरील सर्वात मोठा डिस्काउंट देण्यासह एचडीएफसी कार्ड्सवर ७.५ टक्केपर्यंत इन्स्टंट डिस्काउंट

मुंबई : २ ते १७ एप्रिल दरम्यान रिलायन्स डिजिटलतर्फे आतापर्यंतची सर्वात मोठी डिजिटल डिस्काउंट ऑफर देण्यात येणार आहे. रिलायन्स डिजिटल स्टोअर्स, माय जिओ स्टोअर्स आणि www.reliancedigital.in किंवा www.jiomart.com या संकेतस्थळावर आवडत्या गॅजेट्स आणि उपकरणांची खरेदी केल्यानंतर १० हजार रुपयांपर्यंतचा अतिरिक्त डिस्काउंट देण्यात येत आहे.

इलेक्ट्रॉनिक उपकरणांवरील सर्वात मोठा डिस्काउंट देण्यासह एचडीएफसी कार्ड्सवर ७.५ टक्केपर्यंत इन्स्टंट डिस्काउंट आणि  २ हजार रुपयांपर्यंतची कूपन्स मिळतील. याशिवाय ८० हजार किंवा त्यापेक्षा अधिक रकमेची खरेदी केल्यास १० हजार रुपयांपर्यंत अतिरिक्त डिस्काउंट देण्यात येणार आहे.टीव्ही, स्मार्टफोन, लॅपटॉप, वातानुकूलित यंत्रे, फ्रीज, वॉशिंग मशीन, स्मार्ट वॉच, स्वयंपाकघरात वापरण्यात येणारी उपकरणे यासाठी आकर्षक डील्स असून, त्यावर सुलभ ईएमआय पर्याय देण्यात आला आहे. (वा.प्र)

सर्वात स्वस्त फक्त इथेचनवीन सॅमसंग गॅलेक्सी एस २२  हा फक्त रिलायन्स डिजिटलमध्ये ८४,९०० रुपयांपासून उपलब्ध आहे. नवा कोरा आयफोन १३ हा ६१,९०० या आकर्षक किमतीत उपलब्ध आहे. तसेच सर्वात नवीन व सर्वोत्तम लॅपटॉप्स सर्वप्रथम रिलायन्स डिजिटलमध्येच उपलब्ध करण्यात आले आहेत. वातानुकूलित यंत्रे आणि फ्रीजवरही आकर्षक डील्स देण्यात आली आहेत. ५५ इंचांचा यूएचडी स्मार्ट टीव्ही केवळ ३४,९९० रुपयांपासून उपलब्ध आहे.

टॅग्स :रिलायन्सऑनलाइन