ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात ‘सार्वजनिक बांधकाम’ अव्वल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2026 06:43 IST2026-03-29T06:42:39+5:302026-03-29T06:43:19+5:30
मनीषा पाटणकर-म्हैसकर यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव

ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात ‘सार्वजनिक बांधकाम’ अव्वल
मुंबई : राज्य सरकारच्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा आणि सेवाकर्मी कार्यक्रमांतर्गत मंत्रालयीन विभागात १८६.७५ गुणांसह सार्वजनिक बांधकाम विभाग सर्वोत्तम ठरला. शनिवारी सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडलेल्या पुरस्कार सोहळ्यात विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा पाटणकर-म्हैसकर यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
शासकीय कामकाज पारदर्शक, गतिमान व नागरिकाभिमुख करण्याच्या हेतूने ई-गव्हर्नन्स सुधारणा व सेवाकर्मी कार्यक्रम राबविण्यात आला होता. या अंतर्गत अधिकृत वेबसाइट, आपले सरकार प्रणाली, ई-ऑफिस, कार्यालयीन डॅशबोर्ड, व्हॉट्सॲप चॅटबॉट, ‘एआय’ व ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर, जीआयएस तंत्रज्ञानाचा कार्यक्षम वापर असे ७ महत्त्वाचे निकष ठरविण्यात आले होते.
पुरस्कारविजेते सर्वोत्तम विभाग
सार्वजनिक बांधकाम विभाग :मनीषा पाटणकर म्हैसकर (अपर मुख्य सचिव)
वनविभाग : मिलिंद म्हैसकर (अपर मुख्य सचिव)
पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग :पराग जैन-नैनुटिया (प्रधान सचिव)
परिवहन व बंदरे विभाग : संजय सेठी (अपर मुख्य सचिव)
पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग :जयश्री भोज (सचिव)
शालेय शिक्षण विभाग : रणजितसिंह देओल (प्रधान सचिव)
वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग : धीरज कुमार (सचिव)