सीएसएमटीवर आंदोलकांचा ठिय्या, कार्यालयात जाणारे मुंबईकर, आंदोलकांची गर्दी आवरताना जीआरपी आणि आरपीएफची दमछाक
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2025 07:52 IST2025-08-30T07:51:28+5:302025-08-30T07:52:22+5:30
मध्य रेल्वेच्या सीएसएमटी स्टेशनवर गुरुवारी रात्रीपासून राज्यभरातून मराठा आंदोलक दाखल झाले. शुक्रवारी सकाळी आंदोलकांची आणि कार्यालयात जाणाऱ्या मुंबईकरांच्या गर्दीचे निर्वाजन करताना लोहमार्ग पोलिश (जीआरपी) आणि रेली प्रोटेक्शन फोर्सची (आरपीएफ) दमछाक झाली

सीएसएमटीवर आंदोलकांचा ठिय्या, कार्यालयात जाणारे मुंबईकर, आंदोलकांची गर्दी आवरताना जीआरपी आणि आरपीएफची दमछाक
- महेश कोले
मुंबई - मध्य रेल्वेच्या सीएसएमटी स्टेशनवर गुरुवारी रात्रीपासून राज्यभरातून मराठा आंदोलक दाखल झाले. शुक्रवारी सकाळी आंदोलकांची आणि कार्यालयात जाणाऱ्या मुंबईकरांच्या गर्दीचे निर्वाजन करताना लोहमार्ग पोलिश (जीआरपी) आणि रेली प्रोटेक्शन फोर्सची (आरपीएफ) दमछाक झाली. गर्दीचे नियोजन करण्यासाठी जीआरपी आयुक्त राकेश कलासागर सकाळी सीएसएमटी स्टेशनवर होते. दुपारनंतर आझाद मैदानावर भरल्याने आंदोलकांनी प्लॅटफॉर्मवरच ठिय्या दिला. त्यातच पावसाचाही जोर वाढल्याने या भागातील आंदोलक स्टेशनवर घेऊन थांबले.
आंदोलकांची वाहने पोलिसांनी शिवडी, कॉटनश्रीन, रे रोड भागात रोखल्याने त्यांनी आझाद मैदान गाठण्यासाठी हार्बर मार्गावरून सीएसएमटीला जाण्याचा पर्याय निवडला. मुंबईत पहिल्यांदा आल्यामुळे अनेक आंदोलकांना नेमके कुठे जाते हैच समजत नसल्याने त्यांनी सीएसएमटी स्टेशनवर ठिय्या मांडला. दरम्यान, सकाळी कार्यालयात जाणारे मुंबईकर आणि आंदोलकांच्या गर्दीचे नियोजन करताना जीआरपी आणि आरपीएफची कसरत झाली. जळगाव, नाशिक, नांदेड, सोलापूर, लातूर, धाराशिव, धुळे या भागातून सर्वाधिक आंदोलक आल्याची शक्यता रेल्वे अधिका-यांनी वर्तवली.
गरज असेल तर सीएसएमटीवर या
दुपारनंतर आंदोलकांची सीएसएमटी स्थानकात मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे गर्दीचे नियंत्रण करता यावे, यासाठी रेल्वेकडून प्रवाशांना आवश्यक असल्यासच सीएसएमटीहून प्रवास करण्याचे आवाहन केले. तसेच याचाबत मध्य रेल्वेच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनी सोशल मीडियावर पोस्ट केली.
आरपीएफ, जीआरपी ठेवणार लक्ष
मराठा आंदोलन शनिवारीदेखील सुरू राहणार असल्यामुळे त्यांचा सीएसएमटी स्टेशनवर मुक्काम राहणार आहे. यामुळे कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी साधी १०० पेक्षा जास्त पोलिस तैनात ठेवणार असल्याचे लोहमार्ग पोलिस आयुक्त राकेश कलासागर यांनी सांगितले. सर आरपीएफकड़ी सर्व परिस्थितीचा आढावा घेत रेल्वेया मालमतेचे संरक्षण होईल यावाडे लड़ा ठेवणार असल्याचे अधिकान्यांनी सांगितले.
जळगाववरून रात्रीपासून स्टेशनवर मुक्काम केला आहे. मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आम्ही येथून जाणार नाही.
- अमोल बोरसे पाटील, आंदोलक, जळगाव
ऑफिसला जाण्यासाठी मी रोजप्रमाणे सीएसएमटीला पोहोचले. पण आता बाहेर कुठून जाऊ हेच समजायला मार्ग नाही.
- राधिका नकाशे, मुंबईकर प्रवासी