निर्माता करण जोहरला एनसीबीचे समन्स; २०१९मधील कथित ड्रग्ज पार्टी भोवणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2020 06:40 IST2020-12-18T03:41:41+5:302020-12-18T06:40:17+5:30
बॉलीवूड ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी करण जोहरचे नाव पहिल्यापासून चर्चेत राहिले आहे

निर्माता करण जोहरला एनसीबीचे समन्स; २०१९मधील कथित ड्रग्ज पार्टी भोवणार?
मुंबई : अमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (एनसीबी) प्रसिद्ध चित्रपट निर्माता करण जोहरला गुरुवारी समन्स बजावले. २०१९ मध्ये त्याच्या घरी झालेल्या कथित ड्रग्ज पार्टीबद्दल त्याच्याकडे विचारणा करण्यात आली. शुक्रवारपर्यंत त्याला माहिती द्यावी लागणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
बॉलीवूड ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी करण जोहरचे नाव पहिल्यापासून चर्चेत राहिले आहे. शिरोमणी अकाली दलाचे (एसएडी) नेते मनजिंदरसिंग सिरसा यांनी करण जाेहरच्या पार्टीची व्हिडीओ क्लिप जारी करून चौकशीची मागणी केली होती. मात्र करण जोहरने सर्व आरोप फेटाळले होते. तसेच अब्रूनुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा दिला होता.