Join us
Daily Top 2Weekly Top 5

मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर वाढला राजीनाम्यासाठी दबाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2021 06:31 IST

भाजपचा आंदोलनाचा इशारा; मुंडे यांची शरद पवारांशी चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : एका महिलेने बलात्काराचा आरोप केलेले सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढला आहे. त्यांनी राजीनामा न  दिल्यास भाजप आंदोलन करेल, असा इशारा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला. तर, मुंडे यांनी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची स्वतंत्रपणे भेट घेत त्यांची बाजू मांडली.

मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीस मुंडे उपस्थित होते. तत्पूर्वी त्यांनी शरद पवार यांच्याशी चर्चा केली. मात्र, मंत्रिपदाचा राजीनामा देण्याबाबत मुंडे द्विधा मन:स्थितीत असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. शेवटी, शरद पवार त्यांना काय आदेश देतात, यावरच सगळे अवलंबून असेल, असे मानले जाते. चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. लोकशाहीचे संकेत, नैतिकता व घटनेच्या दृष्टीनेही मुंडे यांनी राजीनामा द्यायला हवा. ते राजीनामा देत नसतील तर त्यांचे नेते शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना राजीनामा द्यायला सांगावे, असे आवाहन पाटील यांनी केले. चूक घडली आहे तर राजीनामा देऊन प्रायश्चित्त घ्यायला हवे, असे ते म्हणाले.

फडणवीस यांचा सावध पवित्राn भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ आणि भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष उमा खापरे यांनी मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. n तथापि, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी  नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना, धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या आरोपांची पोलिसांनी चौकशी करावी आणि या चौकशीत जे काही सत्य समोर येईल, त्यावर आम्ही निश्चितपणे मागणी करू, असे सांगितले. n चंद्रकांत पाटील यांनी एकीकडे मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली असताना फडणवीस यांनी मात्र आधी चौकशी मग मागणी, असा पवित्रा घेतला.

निवडणूक आयोगाकडे तक्रार भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले असून त्यात धनंजय मुंडे यांनी त्यांच्या निवडणूक शपथपत्रात अपत्यांची माहिती लपवली, दुसऱ्या विवाहाची माहितीदेखील लपवली. या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली आहे.

राजीनाम्याची शक्यता फेटाळलीराष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मात्र धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची शक्यता फेटाळली. ते म्हणाले की, राजकीय आयुष्यामध्ये एका विशिष्ट टप्प्यावर पोहोचण्यासाठी बराच संघर्ष करावा लागतो. अशावेळी कोणी काही आरोप करत असेल तर त्याची आधी चौकशी होणे आवश्यक आहे. सत्यता न पडताळता निष्कर्षावर येणे योग्य नाही.

करणी सेनेचे समर्थन ‘द्विभार्या प्रतिबंधक कायदा धनंजय मुंडेंच्या प्रकरणात लागू होऊ शकत नाही. मुस्लिम ४-४ लग्न करतात, तर एखाद्या हिंदूने दुसरं लग्न केलं म्हणून काय फरक पडतो’, असे म्हणत महाराष्ट्र करणी सेनेचे पदाधिकारी अजय सिंह सेंगर यांनी धनंजय मुंडे यांचे जोरदार समर्थन केले आहे. 

टॅग्स :धनंजय मुंडेराष्ट्रवादी काँग्रेसशरद पवार