मनोहर कुंभेजकरमुंबई-उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राधान्याने आता लस दिली जाणार आहे. यासंदर्भात काल रात्री उशिरा मुंबई महानगर पालिकेने सुधारित पत्रक जारी केले आहे. यामुळे मुंबईतून परदेशी उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थाना आणि त्यांच्या पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.या संदर्भात काल सायंकाळी शिवसेनेच्या प्रवक्त्या व प्रभाग क्रमांक ७ च्या नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पालिका आयुक्तांनी लसीकरणाची विशेष व्यवस्था राबवावी अशी मागणी केली होती. तर मुंबई ग्राहक पंचायतीचे कार्याध्यक्ष अॅड.शिरीष देशपांडे यांनी देखिल दि. ९ मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी प्राधान्याने लसीकरण मोहिम सुरू करा अशी मागणी केली होती. सदर मागणीचे वृत्त दैनिक लोकमत मध्ये १० मे रोजी प्रसिद्ध झाले होते.
उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राधान्याने कोरोना प्रतिबंधात्मक लस मिळणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2021 17:01 IST
Coronavirus Vaccine : मुंबई महापालिकेचे सुधारीत परिपत्रक जारी, आदित्य ठाकरेंनी घातलं या प्रकरणी लक्ष
उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राधान्याने कोरोना प्रतिबंधात्मक लस मिळणार
ठळक मुद्देमुंबई महापालिकेचे सुधारीत परिपत्रक जारीआदित्य ठाकरेंनी घातलं या प्रकरणी लक्ष