प्रशांत दामले आले नव्याने 'फॉर्म'मध्ये...! प्रेक्षकांची मते जाणण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2020 01:59 AM2020-07-09T01:59:21+5:302020-07-09T02:00:45+5:30

गेली तीन महिने नाट्यगृहे बंद आहेत आणि ती पुन्हा कधी सुरु होतील हे सध्यातरी सांगणे कठीण आहे. साहजिकच, नाट्यवेड्या रसिकांना त्यांच्या आवडीपासून वंचित राहावे लागत आहे.

Prashant Damle came in a new form ...! Trying to know the opinion of the audience | प्रशांत दामले आले नव्याने 'फॉर्म'मध्ये...! प्रेक्षकांची मते जाणण्याचा प्रयत्न

प्रशांत दामले आले नव्याने 'फॉर्म'मध्ये...! प्रेक्षकांची मते जाणण्याचा प्रयत्न

Next

- राज चिंचणकर
मुंबई : एकीकडे कोरोनाच्या साथीमुळे नाट्यव्यवसायावर पडलेला पडदा कधी उघडणार हे अनिश्चित असतानाच, नाट्यसृष्टीचे विक्रमादित्य प्रशांत दामले मात्र नव्याने 'फॉर्म'मध्ये आले आहेत. त्यांनी थेट नाट्यरसिकांना साद घातली असून, मायबाप रसिकांची नाटकांच्या संदर्भाने काही मते जाणून घेण्याचा ते प्रयत्न करत आहेत. त्यासाठी त्यांनी सोशल मीडियावर एक 'फॉर्म' प्रसिद्ध केला असून, याद्वारे त्यांनी रसिकजनांकडून मते मागवत एक अभियान सुरू केले आहे.

गेली तीन महिने नाट्यगृहे बंद आहेत आणि ती पुन्हा कधी सुरु होतील हे सध्यातरी सांगणे कठीण आहे. साहजिकच, नाट्यवेड्या रसिकांना त्यांच्या आवडीपासून वंचित राहावे लागत आहे. कदाचित, पुढच्या काही कालावधीत नाट्यगृहे खुली होतील आणि पुन्हा एकदा 'तिसरी घंटा' घणघणेल. मात्र या मधल्या काळात, नाट्यरसिकांची रुची, सवय यात बदल झाला असण्याची शक्यता आहे. अशा पार्श्वभूमीवर, रसिकांचे लाडके अभिनेते व नाट्यनिर्माते प्रशांत दामले यांनी आगळी संकल्पना लढवली असून, त्यांनी या अभियानाद्वारे थेट रसिकांशीच संवाद साधण्याचा प्रयत्न केला आहे.

प्रशांत दामले यांनी त्यांच्या फेसबुक वॉलवर एक फॉर्म टाकला असून, रसिकांनी तो भरून पाठवायचा आहे. हा फॉर्म मुंबई, पुणे, नाशिक, मराठवाडा, नागपूर व पश्चिम महाराष्ट्र येथील नाट्यरसिकांसाठी आहे. या फॉर्मद्वारे रसिकांची आवडनिवड ओळखण्यास मदत होणार असून, या माध्यमातून रसिकजनांचा एकत्रित डेटासुद्धा तयार होणार आहे.https://forms.gle/RBeUqV7D1Qweo4YV6 ही या फॉर्मची लिंक असून, प्रशांत दामले यांच्या फेसबुक वॉलवरसुद्धा ही लिंक उपलब्ध
आहे.

अजून काही महिने तरी नाट्यगृहे सुरु होण्याची शक्यता नाही. त्यामुळे या काळात हे अभियान राबवत आहे. याचा उपयोग भविष्यात नाट्यनिर्मिती करण्यासाठी होईल. या मधल्या काळात रसिकांच्या आवडीनिवडीत काही फरक झाला आहे का; तसेच रसिकांच्या संदर्भाने नाट्यविषयक इतर माहितीही या फॉर्मद्वारे हाती येईल. - प्रशांत दामले, अभिनेते
व नाट्यनिर्माते

Web Title: Prashant Damle came in a new form ...! Trying to know the opinion of the audience

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.