Join us
Daily Top 2Weekly Top 5

नाट्यनिर्माता प्रसाद कांबळींकडून जीवे मारण्याची धमकी, सुशील आंबेकरांची तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2018 22:53 IST

नाट्य निर्माते संघ आणि नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार सुशील आंबेकर यांनी केली आहे. 

मुंबई : नाट्य निर्माते संघ आणि नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार सुशील आंबेकर यांनी केली आहे. 

एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, नाट्य निर्माता संघाचे सदस्य सुशील आंबेकर यांनी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात नाट्य निर्माते संघ आणि नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत प्रसाद कांबळी यांनी 6 ऑगस्टला झालेल्या निर्मात्यांच्या बैठकीत धमकी दिल्याचा आरोप सुशील आंबेकर यांनी केला आहे. 

दरम्यान, याप्रकरणी प्रसाद कांबळी यांच्याशी संपर्क साधला असता, ही तक्रार चुकीची असून याबाबत मी योग्य तो जबाब पोलिसांकडे नोंदवणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच, शिवाजी पार्क पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरिक्षक सुनील देशमुख या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 

 

टॅग्स :गुन्हामुंबईमहाराष्ट्र