Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीपासून दूर, प्रभारी अध्यक्षा रेखा ठाकूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2021 14:10 IST

प्रकाश आंबेडकर हे काही काळासाठी वंचित आघाडीपासून दूर झाल्यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या प्रभारी अध्यक्ष म्हणून रेखा ठाकुर यांच्याकडे पदभार देण्यात आला आहे

ठळक मुद्देप्रकाश आंबेडकर हे काही काळासाठी वंचित आघाडीच्या कार्यक्रमापासून दूर झाल्यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या प्रभारी अध्यक्ष म्हणून रेखा ठाकुर यांच्याकडे पदभार देण्यात आला आहे.

पुणे - वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज सकाळी फेसबुक लाइव्ह आणि व्हिडिओच्या माध्यातून कार्यकर्ते, नेते आणि पदाधिकाऱ्यांना सूचना केली आहे. काही व्यक्तिगत कारणांसाठी मी सामाजिक, राजकीय कार्यक्रमापासून दूर जात आहे. पुढील 3 महिन्यांसाठी मी कार्यक्रमात कार्यरत राहणार नाही. मात्र, आपण आंदोलनाची सुरुवात केली आहे. त्यामुळे आपले पुढील कार्यक्रम, पक्षाची ध्येय-धोरणे सुरुच राहतील, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. 

प्रकाश आंबेडकर हे काही काळासाठी वंचित आघाडीच्या कार्यक्रमापासून दूर झाल्यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या प्रभारी अध्यक्ष म्हणून रेखा ठाकुर यांच्याकडे पदभार देण्यात आला आहे. त्यामुळे, रेखा ठाकूर यांना सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहनही आंबडेकरांनी महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांना केले आहे. तसेच, आगामी काळात 5 जिल्ह्यांत स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका असून सर्व कार्यकर्त्यांनी विजय मिळविण्याच्या दिशेने वाटचाल करावी, असेही त्यांनी म्हटले. 

डॉ. अरुण सावंत महाराष्ट्र कमिटी, जिल्हा कमिटी आणि सर्व कार्यकर्त्यांनी पक्षाच्या यशस्वी वाटचालीसाठी आणि विजयासाठी रेखा ठाकूर यांना सहकार्य करावे, असे आंबेडकर यांनी आपल्या व्हिडिओत म्हटले आहे. आंबडेकर यांनी ट्विटरवरुन हा व्हिडिओ शेअर केला आहे. आपल्या व्यक्तिगत कारणासाठी सार्वजनिक कार्यक्रमातून पुढील 3 महिन्यांसाठीच आपण अध्यक्षपदापासून दूर राहत असल्याचे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :वंचित बहुजन आघाडीप्रकाश आंबेडकरमुंबईराजकारण