Join us

BREAKING: प्रकाश आंबेडकर मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीसाठी मंत्रालयात, कोणत्या मुद्द्यावर चर्चा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2022 18:13 IST

राज्यात वंचित बहुजन आघाडी आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या युतीची चर्चा असतानाच आता वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे.

मुंबई-

राज्यात वंचित बहुजन आघाडी आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या युतीची चर्चा असतानाच आता वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी प्रकाश आंबेडकर मंत्रालयात पोहोचले आहेत. दोघांमध्ये नेमक्या कोणत्या मुद्द्यावर चर्चा सुरू आहे याची नेमकी माहिती समोर आलेली नाही. पण मुंबईतील इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या संदर्भात ही भेट असल्याचं बोललं जात आहे. तसंच दोघांमध्ये राजकीय चर्चा होण्याचीही दाट शक्यता आहे. 

प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे काही दिवसांपूर्वी एकाच मंचावर आले होते. त्यानंतर आगामी पालिका निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडी उद्धव ठाकरेंच्या गटासोबत युती करेल अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. महत्वाची बाब म्हणजे दोन्ही नेत्यांमध्ये याबाबतची प्राथमिक चर्चा झाल्याचीही माहिती समोर आली होती. यातच आता प्रकाश आंबेडकर थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी पोहोचल्यानं विविध चर्चांना उधाण आलं आहे. 

टॅग्स :प्रकाश आंबेडकरएकनाथ शिंदे