Praful Patel questioned by ED today | ईडीकडून प्रफुल्ल पटेल यांची आज चौकशी

ईडीकडून प्रफुल्ल पटेल यांची आज चौकशी

मुंबई : मृत गँगस्टर इक्बाल मिर्ची याची मालमत्ता विकत घेतल्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांची शुक्रवारी (दि. १८) चौकशी करण्यात येईल. वरळीतील सीजे हाउसमधील त्यांच्या मालकीच्या दोन फ्लॅटच्या खरेदी व्यवहाराबाबत त्यांची ईडीच्या दक्षिण मुंबईतील बेलार्ड पियर्ड परिसरातील कार्यालयात चौकशी होईल.

विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असल्याने पटेल यांच्या चौकशीचे राजकीय पडसाद उमटू नयेत याबाबत पुरेशी दक्षता घेण्यात येणार असल्याचे समजते. सीजे हाउसमधील मिर्चीच्या मालकीच्या दोन फ्लॅट पटेल यांनी विकत घेतल्याचा अधिकाऱ्यांचा संशय आहे. या प्रकरणी अटक केलेल्या रणजीत सिंग बिंद्रा व हरुण युसूफ दलालांच्या चौकशीतून ही माहिती पुढे आली आहे. २००७ मध्ये त्याचा विकास करार होऊन हस्तांतर करण्यात आले. पटेल यांची त्या व्यवहारावर सहमालक म्हणून स्वाक्षरी असल्याचे सांगण्यात येते. त्याबाबत त्यांची चौकशी होईल.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Praful Patel questioned by ED today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.