Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रज्ञासिंहने केला शहिदांचा अपमान - पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2019 04:15 IST

मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंहने करकरे यांच्यासह कामटे, साळसकर आणि तुकाराम ओंबाळे या शहिदांचा अपमान केला आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.

मुंबई : देशासाठी बलिदान देणारे हेमंत करकरे यांच्याविषयी अपमानास्पद भाषा वापरून मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंहने करकरे यांच्यासह कामटे, साळसकर आणि तुकाराम ओंबाळे या शहिदांचा अपमान केला आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.साध्वी प्रज्ञासिंहला भाजपने भोपाळ मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. याच साध्वीने ‘हेमंत करकरेंच्या मृत्यूने माझे सुतक सुटले!’ असे अत्यंत अवमानकारक विधान केले आहे. त्यावर पाटील म्हणाले, जामिनावर सुटलेल्या साध्वी प्रज्ञासिंग या आरोपीने केलेले विधान अत्यंत धक्कादायक असून यांच्यामध्ये किती दहशतवाद मुरलेला आहे हेच यातून दिसून येते आहे. मोदी शहिदांच्या नावावर मते मागत आहेत आणि त्यांचे उमेदवार शहीद करकरे यांच्या मृत्यूबद्दल आनंद व्यक्त करत आहेत, याची भाजपला आणि शिवसेनेला लाज वाटली पाहिजे. साध्वी प्रज्ञासिंहसारख्या अतिरेकी विचारांच्या प्रवृत्तीवर कठोर कारवाई व्हायला हवी, असे ते म्हणाले.

टॅग्स :राष्ट्रवादी काँग्रेसजयंत पाटीलसाध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर