portfolio the newly formed ministers of the Fadnavis government | फडणवीस सरकारमधील नवोदित मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर, वाचा कुणाला मिळालं कोणतं खातं  
फडणवीस सरकारमधील नवोदित मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर, वाचा कुणाला मिळालं कोणतं खातं  

मुंबई - दीर्घकाळ लांबलेला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर आज पार पडला. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात एकूण 13 नव्या मंत्र्यांनी शपथ घेतली दरम्यान, या मंत्र्यांचे खातेवाटप आज संध्याकाळी जाहीर झाले आहे. या खातेवाटपामध्ये राधाकृष्ण विखे-पाटील  यांना गृहनिर्माण तर जयदत्त क्षीरसागर यांना रोजगार आणि फलोत्पादन खाते मिळाले आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांचे खाते डॉ. सुरेश खाडे यांना देण्यात आले असून, आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांचे खाते प्रा. डॉ. अशोक उईके यांना देण्यात आले आहे.

खातेवाटपाची यादी पुढीलप्रमाणे   
1) राधाकृष्ण विखे-पाटील  - गृहनिर्माण
2) जयदत्त क्षीरसागर - रोजगार हमी व फलोत्पादन 
3) आशीष शेलार - शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण 
4) संजय कुटे - कामगार, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण 
5) सुरेश खाडे - सामाजिक न्याय 
6) अनिल बोंडे - कृषी
7) अशोक उईके - आदिवासी विकास 
8) तानाजी सावंत - जलसंधारण 
9) राम शिंदे - पणन आणि वस्त्रोद्योग 
10)  संभाजी पाटील  - अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण, कौशल्य विकास, माजी सैनिकांचे कल्याण 
11) जयकुमार रावल - अन्न व औषध प्रशासन, पर्यटन व राजशिष्टाचार 
12) सुभाष देशमुख - सहकार, मदत व पुनर्वसन 

राज्यमंत्री 
1) योगेश सागर - नगरविकास 
2) अविनाश महातेकर - सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य
3) संजय भेगडे -  कामगार, पर्यावरण, मदत व पुनर्वसन, भूकंप पुनर्वसन
4) परिणय फुके -  सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), वने, आदिवासी विकास 
5) अतुल सावे - उद्योग आणि खनिकर्म, अल्पसंख्याक विकास आणि वक्फ


खातेवाटपाची यादी पुढीलप्रमाणे 


Web Title: portfolio the newly formed ministers of the Fadnavis government
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.