Pornography by a woman sent from WhatsApp | व्हॉॅट्सअ‍ॅपवरून पाठविली महिलेला अश्लील चित्रफीत

व्हॉॅट्सअ‍ॅपवरून पाठविली महिलेला अश्लील चित्रफीत

मुंबई : डॉक्टरकडे रिसेप्शनिस्ट म्हणून काम करणाऱ्या महिलेला अश्लील चित्रफीत पाठवत शिवीगाळ केल्याप्रकरणी गिरगाव येथील दा. भ. मार्ग पोलिसांनी एकाला अटक केली आहे. सदर महिला गिरगाव परिसरातील डॉक्टरकडे रिसेप्शनिस्ट म्हणून काम करते. बुधवारी सायंकाळच्या सुमारास या महिलेस व्हॉट्स अ‍ॅपवर एका अनोळखी इसमाने अश्लील चित्रफीत पाठविली. यावेळी महिलेने कोण आहे? अशी विचारणा करताच त्या इसमाने महिलेला शिव्या लिहून पाठविल्या.
याबाबत महिलेने दा. भ. मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तांत्रिक मदतीच्या आधारे गुन्हे प्रकटीकरण शाखेने या गुन्ह्याच्या तपासादरम्यान कामाठीपुरा येथून १९ वर्षीय तरुणाला ताब्यात घेतले.
या तरुणाच्या मोबाइलची तपासणी केली असता, त्याच्या व्हॉट्स अ‍ॅपवरून फिर्यादी महिलेला अश्लील चित्रफीत व शिवीगाळ केल्याचे आढळून आले. त्याकडे केलेल्या चौकशीत आढळले की, तो कामाठीपुरा येथील मेडिकलमध्ये डिलिव्हरी बॉयचे काम करत आहे. आरोपी व महिला यांचा एक व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप आहे. त्या ग्रुपमधून आरोपीने महिलेचा क्रमांक प्राप्त करून, त्यावर स्वत:ची अश्लील चित्रफीत पाठवत शिवीगाळ केली. या आरोपीस पुढील कारवाईकरिता वरिष्ठ पोलीस निरीक्षक दा. भ. मार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Pornography by a woman sent from WhatsApp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.