Police watch over inmates on bail, release criminals on parole against certain conditions | जामिनावरील कैद्यांवर पोलिसांचा वॉच, काही अटींच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारांना पॅरोलवर सोडले   

जामिनावरील कैद्यांवर पोलिसांचा वॉच, काही अटींच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारांना पॅरोलवर सोडले   

मुंबई - कारागृहामध्येही कोरोनाने शिरकाव केला.  या कोंडवाड्यात कोरोनाचा फैलाव वाढू नये म्हणून प्रशासनाने ११  हजार कैद्यांना जामिनावर बाहेर काढले. यात मुंबईतील हजारो कैद्यांचा समावेश आहे. या कैद्यांना स्थानिक पोलीस ठाण्यात हजेरी लावणे बंधनकारक आहे. त्यामुळे स्थानिक पोलीस या कैद्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहेत. 

गुन्हे प्रकरणातील सुनावणीसाठी कैद्यांना पुढचे काही दिवस न्यायालयात नेणे बंद करण्यात आले.  तर, अत्यावश्यक सुनवाणी प्रकरण ही व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून घेण्यात आली. सध्या बोर्डावर असलेल्या कैद्यांना सुनावणीसाठी नेण्यात येत आहे.  

७ वर्षांपेक्षा कमी शिक्षा असलेल्या कैद्यांना जामीन
पहिल्या टप्प्यात कोर्टाने ७ वर्षांपेक्षा कमी शिक्षा मिळालेल्या बलात्कार, पॉक्सो आणि आर्थिक  फसवणुकीतील प्रकरणांमधील कैद्यांना आणि अंडरट्रायलमधील कैद्यांना जामिनावर सोडण्यात आले.  

महाराष्ट्रामध्ये ९ कारागृह आहेत. भायखळा महिला कारागृहाचा समावेश आहे. तर २८ जिल्हा कारागृह आहेत. यात एकूण ३८ हजार कैदी आहेत. यातच कोरोनाच्या काळात आर्थर रोड कारागृहात पहिला कोरोनाबाधित कैदी सापडल्याने खळबळ उडाली.  

या गुन्हेगारांवर आता पाळत ठेवली जात आहे का?
मुंबईतील आर्थर रोड कारागृहात कोरोनाने थैमान घातल्यानंतर, भायखळा महिला कारागृहातही काही अधिकाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली. 
पुढे राज्यभरातील कारागृहातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला. आतापर्यंत तब्बल २ हजारांहून अधिक कैद्यांसह ४१६ कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे.  ६ कैद्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कारागृहातील कोरोनाचा फैलाव लक्षात घेता ११ हजार कैद्यांची टप्प्याटप्प्याने सुटका केली.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Police watch over inmates on bail, release criminals on parole against certain conditions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.