मुंबईतील कबुतरखान्यांचा मुद्दा सध्या चिघळला आहे. महापालिकेने कबुतरखाने बंद करण्याचा निर्णय घेतला. त्याला विरोध होत आहे. मुंबई उच्च न्यायालयाने कबुतरखाने बंद ठेवण्याचा योग्य असल्याचे सांगत बंदी कायम ठेवली आहे. असे असतानाही महेंद्र संकलेचा नावाचा व्यक्ती दादर कबुतरखान्याजवळ कार घेऊन आला. त्याने कारच्या छतावर ट्रे ठेवून कबुतरांना खाद्य दिले. इतकंच नाही तर न्यायालयावरही त्यांनी टीका केली होती. या प्रकरणी आता पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार संकलेचाची कारही जप्त करण्यात आली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
कबुतरखाने बंद करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला. त्यानंतर नागरिकांनी आंदोलन केले. त्यामुळे कबुतरांना मर्यादित खाद्य देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यानंतर हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात गेले. न्यायालयाने नागरिकांचे आरोग्य महत्त्वाचे असल्याचे सांगत कबुतरखाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
याचदरम्यान लालबागमधील रहिवाशी असलेला महेंद्र संकलेचा कार घेऊन दादरमधील कबुतरखान्याजवळ आले. त्यांनी कारच्या छतावर धान्य असलेला ट्रे ठेवलेला होता. ती कार त्यांनी दादरमधील कबुतरखान्याजवळ उभी केली. या घटनेचा व्हिडीओ लोकांनी बनवला. त्यानंतर ते तिथून निघून गेले. पुन्हा त्यांनी कबुतरखान्याजवळ कार उभी केली.
{{{{facebook_video_id####https://www.facebook.com/reel/24200788862940515/}}}}
उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या या सगळ्या प्रकाराची दखल घेत मुंबई पोलिसांनी दखल घेतली आहे. पोलिसांनी महेंद्र संकलेचावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी संकलेचा याची कार जप्त केली असून, याप्रकरणी त्याला नोटिसही बजावली आहे.
लोकांनासोबत अरेरावीची भाषा
मी माझ्या कारवर कबुतरांना खाद्य देतो, याची सरकार आणि न्यायाधीशांना काय प्रॉब्लेम आहे? असेही संकलेचा म्हणाला होता. मी माझ्या कारवर कबुतरांना खाद्य देण्यासाठी हे तयार केले आहे. आणि या ट्रेमध्येही पोलीस, सरकार खाद्य टाकू नका म्हणत असतील, तर त्यांना काय अडचण आहे? असे संकलेचाने म्हटले होते.