अॅण्टॉप हिलमध्ये पोलिसाला धक्काबुक्की, दोन भावंडांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2018 06:40 IST2018-10-21T06:40:01+5:302018-10-21T06:40:14+5:30
रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या लाऊडस्पीकरचा आवाज बंद करण्यासाठी गेलेल्या पोलीस कॉन्स्टेबल जयप्रकाश माळी यांना दोन मद्यपी भावंडांनी धक्काबुक्की केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली.

अॅण्टॉप हिलमध्ये पोलिसाला धक्काबुक्की, दोन भावंडांना अटक
मुंबई : रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या लाऊडस्पीकरचा आवाज बंद करण्यासाठी गेलेल्या पोलीस कॉन्स्टेबल जयप्रकाश माळी यांना दोन मद्यपी भावंडांनी धक्काबुक्की केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. या प्रकरणी ख्रिस्तोफर मासला मणी (वय ४३) आणि त्याचा भाऊ थॉमस मासला मणी (३४, दोघे रा. मीरा रोड) यांना अॅण्टॉप हिल पोलिसांनी अटक केली.
अॅण्टॉप हिलमध्ये शुक्रवारी रात्री देवी विसर्जनानिमित्त पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता. अॅण्टॉप हिलच्या सेक्टर ६ मध्ये लाऊडस्पीकरचा मोठ्याने आवाज येऊ लागला. त्यामुळे कर्तव्यावर असलेल्या आॅपरेटर पोलीस शिपाई माळी यांनी चालक संदीप पोळ यांच्यासह आवाजाच्या दिशेने धाव घेतली. त्यांनी कार्यकर्त्यांना लाऊडस्पीकर बंद करण्यास सांगितले. त्या वेळी दारूच्या नशेत असलेल्या या दोन भावंडांनी माळी यांना शिवीगाळी करीत त्यांची कॉलर पकडून धक्काबुक्की केली. तेव्हा पोलीस शिपाई संदीप पोळ यांनी माळी यांची सुटका करीत दोन्ही भावंडांना ताब्यात घेतले.