Join us

मनसे नेत्यांचे लोकेशन पोलिसांना सापडेना, संदीप देशपांडे यांचा कारचालक गजाआड

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2022 03:06 IST

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांच्या कारचालकाला शुक्रवारी अटक करण्यात आली.

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांच्या कारचालकाला शुक्रवारी अटक करण्यात आली. मात्र, देशपांडे तसेच संतोष धुरी यांचे लोकेशन सापडत नसल्याने त्यांना अटक करण्यात शिवाजी पार्क पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. त्यांचा शोध सुरू आहे.

देशपांडे हे ४ मे रोजी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या शिवाजी पार्क येथील निवासस्थानाबाहेरून पळून गेले होते. त्यांना अडविण्याच्या प्रयत्नात त्यांनी एका महिला कॉन्स्टेबलला आणि एका निरीक्षकाला जखमी केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. पोलीस ठाण्यातील पोलीस आणि गुन्हे शाखेचे अधिकारी २४ तासांहून अधिक काळ देशपांडे यांचा ठावठिकाणा शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत. पोलिसांनी त्यांच्या चालकाला भरधाव वाहन चालविल्याप्रकरणी अटक केली आहे.

टॅग्स :मनसेसंदीप देशपांडे