Join us  

पोलीस बनला देवदूत! आप हमारे लिये भगवान हो; जीव वाचवलेल्या तरुणाच्या वडिलांचे उद्गार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2020 8:07 PM

प्रसंगावधान दाखवत तरुणाचे वाचवले प्राण

ठळक मुद्दे स्ट्रेचर आणि हमालाची वाट पाहता रेल्वे पोलीस कॉन्स्टेबल भाडाळे यांनी तात्काळ खांद्यावर उचलून मदत केली.अंकितवर सायन उपचार सुरु असून आता त्याची प्रकृती स्थिर आहे. डॉक्टरांनी भाडाळे यांनी तात्काळ मदत केल्याने त्यांचे कौतुक केले.

मुंबई - रेल्वेपोलिसांच्या शिरपेचात कौतुकाचा तुरा रोवला आहे. दादर रेल्वे स्थानकावर एका रेल्वे पोलीस कॉन्स्टेबलने प्रसंगावधान दाखवत देवासारखा मदतीला धावून गेल्यामुळे २५ वर्षीय तरुणाचा जीव वाचला आहे. अंकित शुक्ला (२५) हा तरुण शनिवारी रात्री १०.४० वाजताच्या सुमारास दादर रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक ३ वर उभा होता. अचानक त्याला चक्कर आली आणि तो रेल्वे रुळावर पडला. त्यावेळी स्ट्रेचर आणि हमालाची वाट पाहता रेल्वे पोलीस कॉन्स्टेबल भाडाळे यांनी तात्काळ खांद्यावर उचलून मदत केली. त्यामुळे अंकितचा जीव वाचला. त्यावर अंकितच्या वडिलांनी पोलीस भाडाळे यांच्यासाठी आप हमारे लिये भगवान हो! असे उद्गार काढले अशी माहिती दादर (मध्य रेल्वे) लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांनी माहिती दिली.फलाट क्रमांक ३ वर रेल्वे पोलीस कॉन्स्टेबल भाडाळे आपल्या सहकाऱ्यांसोबत गस्तीवर होते. त्यावेळी भाडाळे यांनी चक्कर येऊन पडलेल्या अंकित शुक्लावर गेले. त्यानंतर ते लगेच उडी मारुन रुळावर उतरले आणि महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या दोन जवानांच्या मदतीने अंकितला भाडाळे यांनी खांद्यावर उचलून फलाटावर आणले. तसेच पुढे त्यांनी पादचारी पूलावरुन खाली उतरले आणि सायन रुग्णालयात दाखल केले. अंकितवर सायन उपचार सुरु असून आता त्याची प्रकृती स्थिर आहे. डॉक्टरांनी भाडाळे यांनी तात्काळ मदत केल्याने त्यांचे कौतुक केले. 'आप हमारे लिये भगवान हो!’ असे अंकितचे वडिल भाडाळेंना उद्गार काढले अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांनी काढले. 

टॅग्स :दादर स्थानकपोलिससायन हॉस्पिटलरेल्वे