Join us
Daily Top 2Weekly Top 5

ऑर्केस्ट्रा बारच्या आड अश्लील नाच, पोलिसांच्या धाडीत १२ जणांना पकडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2022 18:51 IST

वरीष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक महेंद्र भामरे सह जरग, यादव, सावंत , सूर्यवंशी यांच्या पथकाने शुक्रवारी रात्री मंत्रा बार वर धाड टाकली.

मीरारोड - काशीमीरा पोलिसांनी दहिसर चेकनाका येथील मंत्रा ऑर्केस्ट्रा बार वर धाड टाकून चालणारा अश्लील नाच बंद पाडून १२ जणांना पकडले आहे. पोलिसांनी बार मालकासह 12 जणांना ताब्यात घेतलं असून विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. 

वरीष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक महेंद्र भामरे सह जरग, यादव, सावंत , सूर्यवंशी यांच्या पथकाने शुक्रवारी रात्री मंत्रा बार वर धाड टाकली. ४ बारबाला तोकडे कपडे घालून अश्लील अंगविक्षेप व नाच करत असताना सापडल्या. पोलिसांनी बारचालक अखिलेशकुमार श्रीकृष्ण तिवारी (३२) सह हिना शेख (३७), कोनिका मडीवाला (२३),  अनिता साहु (२८), ममताकुमारी सिंग (२२) ह्या ४ बारबाला, आर.के.स्वामी रत्नम (४८) रा. भाईंदर, विनोदभाई मालवी (४५) व सुरेंद्रसिंग राजपुत (४८) दोघेही रा. अहमदाबाद, गुजरात ह्यांना पकडण्यात आले. ह्या शिवाय प्रमोद राम (३३), इंद्रदेव यादव (२९), निर्मलकुमार यादव (२४), सुशिलकुमार यादव (२८) ह्या ४ बार कमर्चारीना सुद्धा ताब्यात घेण्यात आले. एकूण १२ जणांवर पोलिसांनी शनिवारी गुन्हा दाखल केला आहे.  

टॅग्स :गुन्हेगारीपोलिसमीरा रोड