विमानात महिलेची छेडछाड, 65 वर्षीय व्यापाऱ्याला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2019 09:30 IST2019-01-08T09:28:56+5:302019-01-08T09:30:34+5:30

दिल्लीहून मुंबईला येणाऱ्या विस्तारा एअरलाइन्स विमानात एका 41 वर्षीय महिलेची छेडछाड काढल्याचा प्रकार घडला. ही घटना सोमवारी घडली. याप्रकरणी 65 वर्षीय व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे.

Police arrest 65-year-old businessman for molesting female passenger onboard Mumbai-bound flight | विमानात महिलेची छेडछाड, 65 वर्षीय व्यापाऱ्याला अटक

विमानात महिलेची छेडछाड, 65 वर्षीय व्यापाऱ्याला अटक

ठळक मुद्देविस्तारा एअरलाइन्स विमानात एका 41 वर्षीय महिलेची छेडछाड 65 वर्षीय व्यापाऱ्याला अटक भारतीय दंड विधान कलम 354 नुसार गुन्हा दाखल

मुंबई : दिल्लीहून मुंबईला येणाऱ्या विस्तारा एअरलाइन्स विमानात एका 41 वर्षीय महिलेची छेडछाड काढल्याचा प्रकार घडला. ही घटना सोमवारी घडली. याप्रकरणी 65 वर्षीय व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे.

सहार पोलीस ठाण्यात याप्रकरणी पीडित महिलेने तक्रार दाखल केली आहे. यामध्ये तक्रारदार महिलेने सांगितले की, दिल्लीमधील व्यापारी अनिल कुमार मुलचंदानी यांनी विमानात प्रवासादरम्यान आपल्याला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. त्यानंतर याप्रकरणी एअरलाइन्सच्या क्रू मेंबर्सकडे त्यांची तक्रार केली. क्रू मेंबर्संनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना ही घटना सांगितली. 

एका पोलीस अधिकाऱ्यांने सांगितले की, आरोपी अनिल कुमार मुलचंदानी यांच्यावर भारतीय दंड विधान कलम 354 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे. आरोपी अनिल कुमार मुलचंदानी यांना त्या महिलेने दोनवेळा समज दिल्यानंतरही त्यांनी तिच्याशी छेडछाड केल्याचे सांगण्यात आले. 

दरम्यान, विस्तारा एअरलाइन्सच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी एअरलाइन्सचे अधिकारी पोलिसांना सहकार्य करत आहेत.  

Web Title: Police arrest 65-year-old businessman for molesting female passenger onboard Mumbai-bound flight