Join us

वीज पुरवठयातील तांत्रिक बिघाडावर उपाय योजना करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2020 16:13 IST

Power supply : विश्वार्हतेचे निर्देशांक चार्ट संकेतस्थळावर प्रसिद्ध करा

मुंबई : महाराष्ट्रातवीज पुरवठयात निर्माण झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे नागरिकांना होणारा मनस्ताप लक्षात घेता भविष्यात उपाय योजना करण्यात याव्यात. आणि दर महिन्याला विश्वार्हतेचे निर्देशांक चार्ट संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावेत, अशा आशायाचे निर्देश ऊर्जा विभागाने महावितरण, टाटा पावर, अदानी इलेक्ट्रिसिटी आणि बेस्ट या वीज कंपन्यांना दिले आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ऊर्जा मंत्री नितीन राऊत तसेच ऊर्जा सचिवांकडे माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी तक्रार केली होती की महाराष्ट्रात वर्षानुवर्षे दर महिन्याला तांत्रिक बिघाडामुळे हजारो तास लाखो ग्राहकांना अंधारात बसावे लागते. महावितरणच्या संकेतस्थळावरील ऑक्टोबर आणि डिसेंबर २०१९  या महिन्यातील संपूर्ण महाराष्ट्रातील विश्वार्हतेचे निर्देशांक चार्टचे अवलोकन केल्यास लक्षात येईल की ऑक्टोबर २०१९ या महिन्यामध्ये महाराष्ट्रात तांत्रिक बिघाडाच्या १५ हजार ७४५ घटना घडल्या. ४ कोटीहून अधिक नागरिकांना २० हजार १७६ तास अंधारात बसावे लागले. डिसेंबर २०१९ च्या चार्टचे अवलोकन केल्यास तांत्रिक बिघाडाच्या १० हजार ९९४ घटना घडल्या. २.७८ कोटीहून अधिक नागरिकांना एकूण १५ हजार १६७ तास अंधारात बसावे लागले.

टाटाने मार्च २०२० तर अदानीने मार्च २०१९ पर्यंतचे चार्ट संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेले आहे. यात १३ हजार २८० घटनांचा उल्लेख आहे. टाटाने एप्रिल २०२० पर्यतची माहिती अपडेट केली आहे. दर महिन्याला हा चार्ट संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे आवशयक आहे.  

टॅग्स :वीजभारनियमनमहाराष्ट्रसरकारमुंबई