दिवाळीच्या स्वागताला गुलाबी थंडी; पुणेकर गारठले, मुंबईकर सुखावले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2020 07:20 AM2020-11-08T07:20:44+5:302020-11-08T07:21:00+5:30

विदर्भातील चंद्रपूर आणि यवतमाळमध्ये ११.५ अशी नीचांकी तापमानाची नोंद झाली.

Pink chill to welcome Diwali; Punekar Garthale, Mumbaikar Sukhawale | दिवाळीच्या स्वागताला गुलाबी थंडी; पुणेकर गारठले, मुंबईकर सुखावले

दिवाळीच्या स्वागताला गुलाबी थंडी; पुणेकर गारठले, मुंबईकर सुखावले

Next

मुंबई/पुणे : दीपावलीची लगबग सुरू झाली असताना राज्यात गुलाबी थंडीचे आगमन झाले आहे. शनिवारी पुण्यात पारा १३.३ अंशांवर घसरल्याने पुणेकर गारठले तर, मुंबई आणि उपराजधानी नागपुरातही अनुक्रमे १३.३ आणि १३.७ अंशाखाली येऊन थंडीने आपल्या आगमनाची वर्दी दिली. त्याच वेळी विदर्भातील चंद्रपूर आणि यवतमाळमध्ये ११.५ अशी नीचांकी तापमानाची नोंद झाली.

पुणेकरांनी गेल्या १० वर्षांत दुसऱ्यांदा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात नीचांकी थंडी अनुभवली. मुंबईत भल्या सकाळी उपनगरवासीयांनी शहरापेक्षा जास्त थंडी अनुभवली. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील तापमानातही घट होऊ लागली आहे.

विदर्भात पारा घसरला

विदर्भात रात्रीचा पारा तब्बल ५ अंशाने घसरला.  पुढच्या आठवड्यात तापमानात आणखी घट होणार असून ते १० अंशावर जाऊ शकते.

Web Title: Pink chill to welcome Diwali; Punekar Garthale, Mumbaikar Sukhawale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.