फिरनी ३५ रुपयांवरून ४० रुपये, पुलाव ९० वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 13:39 IST2026-03-21T13:38:25+5:302026-03-21T13:39:13+5:30

काही विक्रेत्यांना दुकाने तात्पुरती बंद ठेवावी लागली. रमजानच्या काळात मागणी वाढलेली असताना पुरवठा आणि उत्पादनात अडथळे येत असल्याने विक्रेत्यांची कोंडी झाली आहे. त्यामुळे दरवाढ केल्याचे विक्रेते सांगतात.

Phirni from Rs 35 to Rs 40, Pulao to Rs 90 | फिरनी ३५ रुपयांवरून ४० रुपये, पुलाव ९० वर

फिरनी ३५ रुपयांवरून ४० रुपये, पुलाव ९० वर

खलील गिरकर -

मुंबई : पश्चिम आशियातील तणावाचे पडसाद बाजारपेठेत उमटत आहेत. इंधनटंचाई, पुरवठा साखळीतील अडथळे यामुळे खाद्यपदार्थांच्या किमती वाढल्या आहेत. ऐन रमझान महिन्यात फिरनी ३५ रुपयांवरून ४० रुपये, तर पुलावचा भाव ८० रुपयांवरून ९० झाला आहे. गॅस टंचाई ही विक्रेत्यांसमोरची सर्वांत गंभीर समस्या ठरली आहे. 

काही विक्रेत्यांना दुकाने तात्पुरती बंद ठेवावी लागली. रमजानच्या काळात मागणी वाढलेली असताना पुरवठा आणि उत्पादनात अडथळे येत असल्याने विक्रेत्यांची कोंडी झाली आहे. त्यामुळे दरवाढ केल्याचे विक्रेते सांगतात. याचा परिणाम विक्रेते, ग्राहकांवर होत आहे. समोसे पुरवठा करणाऱ्या लोअर परळमधील विक्रेत्याने गॅसअभावी व्यवसाय तात्पुरता बंद ठेवला आहे. 

पर्यायी साधनांचा वापर -
सिलिंडर मिळत नसल्याने विक्रेेते पर्यायी साधनांचा वापर करत आहेत. काही ठिकाणी लाकूड वापरून चुलीवर स्वयंपाक केला जात आहे. त्यामुळे श्रम आणि वेळ वाढत आहे. अपुऱ्या आणि मर्यादित सुविधांमुळे विक्रेत्यांना आर्थिक ताण सहन करावा लागत आहे. कच्चा माल, गॅस आणि इतर खर्च वाढल्याने दरवाढ टाळणे अशक्य झाल्याचे ते सांगतात. वरळी येथे रस्त्यावर मिळणारे डाळ-भात-भाजी जेवण ७० रुपयांवरून ८० रुपयांपर्यंत वाढले आहे.

...तर कामगार जाणार गावी -
परिस्थिती सुधारली नाहीतर कामगारांना राजस्थानला गावी पाठवण्याचा निर्णय त्याने घेतला असून, गॅस उपलब्ध झाल्यानंतरच पुन्हा बोलावले जाईल.

Web Title : खाद्य पदार्थों की बढ़ती कीमतें: आपूर्ति मुद्दों के बीच फिरनी, पुलाव महंगा

Web Summary : पश्चिम एशिया तनाव का मुंबई के खाद्य बाजार पर असर। रमजान में ईंधन की कमी और आपूर्ति श्रृंखला के मुद्दों के कारण फिरनी, पुलाव की कीमतें बढ़ीं। गैस की कमी के कारण विक्रेताओं को विकल्प अपनाने पड़े, जिससे लागत बढ़ गई। कुछ व्यवसाय अस्थायी रूप से बंद, श्रमिकों को नौकरी छूटने का खतरा।

Web Title : Rising Food Prices: Firni, Pulao Costs Surge Amid Supply Issues

Web Summary : West Asia tensions impact Mumbai's food market. Ramadan sees Firni, Pulao prices rise due to fuel shortage and supply chain issues. Gas scarcity forces vendors to use alternatives, increasing costs. Some businesses temporarily close, workers face potential job loss.