सलग पाचव्या दिवशी इंधन दरात घट; पेट्रोल 30 पैशांनी, तर डिझेल 28 पैशांनी स्वस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2018 07:31 IST2018-10-22T07:28:22+5:302018-10-22T07:31:43+5:30

मुंबईत पेट्रोल प्रति लिटर 86.91 रुपये, तर डिझेल 78.54 रुपये

petrol rate decrease 30 paise mumbai diesel price decrease 28 paise | सलग पाचव्या दिवशी इंधन दरात घट; पेट्रोल 30 पैशांनी, तर डिझेल 28 पैशांनी स्वस्त

सलग पाचव्या दिवशी इंधन दरात घट; पेट्रोल 30 पैशांनी, तर डिझेल 28 पैशांनी स्वस्त

मुंबई: सलग पाचव्या दिवशी इंधनाच्या दरात घट झाली आहे. मुंबईत आज पेट्रोल 30 पैशांनी स्वस्त झालं आहे. त्यामुळे आज मुंबईकरांना पेट्रोलसाठी 86.91 रुपये मोजावे लागतील. डिझेलच्या दरातही 28 पैशांची घट झाली आहे. त्यामुळे मुंबईत डिझेलचा दर 78.54 रुपयांवर आला आहे. गेल्या पाच दिवसांपासून देशभरात इंधनाच्या दरात घट होत आहे. 




दिल्लीतही इंधनाचे दर घटले आहेत. दिल्लीतही पेट्रोल 30 पैशांनी स्वस्त झालं आहे. त्यामुळे एक लिटर पेट्रोलसाठी 81.44 रुपये मोजावे लागणार आहे. तर डिझेलच्या दरात 27 पैशांची घट झाली आहे. त्यामुळे दिल्लीत डिझेलचा दर 74.92 रुपयांवर आला आहे. 18 ऑक्टोबरपासून पेट्रोल, डिझेलच्या दरात सतत घट होत आहे. 17 ऑक्टोबर रोजी पेट्रोल, डिझेलच्या दरात कोणताही बदल झाला नव्हता. यानंतर 18 ऑक्टोबरला पेट्रोलच्या दरात घट झाली. तेव्हापासून आजपर्यंत पेट्रोलच्या दरात 1.38 रुपयांची घट झाली आहे.
 
डिझेलच्या दरातदेखील सलग पाचव्या दिवशी घट झाली आहे. पेट्रोलप्रमाणेच डिझेलच्या दरातही 17 ऑक्टोबरला कोणताही बदल झाला नव्हता. मात्र त्यानंतर डिझेलच्या दरात सतत घट होत आहे. आजपर्यंत डिझेलच्या दरात 81 पैशांची घट झाली आहे. गेल्या पाच दिवसांचा अपवाद सोडल्यास देशभरात इंधनाचे दर दररोज वाढत होते. त्यामुळे सामान्य जनता त्रस्त होती. मुंबईत तर पेट्रोलनं नव्वदी ओलांडली होती. यानंतर वाढता जनक्षोभ लक्षात घेता ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात केंद्र सरकारनं पेट्रोलच्या दरात पाच रुपयांची कपात केली होती. मात्र त्यानंतरही पेट्रोल, डिझेलचे दर दररोज वाढत होते. मात्र गेल्या पाच दिवसांपासून पेट्रोल, डिझेलच्या दरात घट होत असल्यानं सर्वसामान्यांना थोडासा दिलासा मिळाला आहे.

Web Title: petrol rate decrease 30 paise mumbai diesel price decrease 28 paise