Join us
Daily Top 2Weekly Top 5

खारघर उष्माघात प्रकरणी कोर्टाचा निर्णय; CBI चौकशीच्या मागणीची याचिका निकाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2023 10:39 IST

राज्य सरकारच्या वतीने महाराष्ट्रभूषण पुरस्कार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना देण्यात आला

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महाराष्ट्रभूषण पुरस्कार सोहळ्यावेळी खारघरमध्ये उष्माघातात १४ जणांच्या झालेल्या मृत्यूप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी करणारी याचिका हायकोर्टाने बुधवारी निकाली काढली. 

राज्य सरकारच्या वतीने महाराष्ट्रभूषण पुरस्कार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना देण्यात आला. सोहळ्यावेळी अनुयायांना उन्हातच ताटकळत ठेवण्यात आले. यावेळी १४ जणांचा उष्माघातामुळे मृत्यू झाला. याबाबत पोलिस तक्रार करूनही दखल न घेतल्याने शैला कांटे यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका केली. याचिकेवरील सुनावणी प्रभारी मुख्य न्या. नितीन जामदार व न्या. अरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठापुढे होती. महाअधिवक्ता बीरेंद्र सराफ यांनी न्यायालयापुढे तपासाचा अहवाल सादर करीत १०० हून अधिक लोकांचे जबाब नोंदविण्यात आल्याची माहिती दिली. 

टॅग्स :गुन्हा अन्वेषण विभागअमित शाहन्यायालय