Permission for new recruitment in Mumbai Fire Brigade | मुंबई अग्निशमन दलात नवीन भरतीसाठी परवानगी

मुंबई अग्निशमन दलात नवीन भरतीसाठी परवानगी

मुंबई : आजच्या घडीला मुंबई अग्निशमन दलात २५ टक्के पदे रिक्त असून यामुळे कामकाजावर परिणाम होत असतानाच आता अग्निशमन दलात नवीन भरतीसाठी महापालिका आयुक्तांनी परवानगी दिली आहे. त्यामुळे आता लवकरच रिक्त पदे भरली जाणार आहेत.

मुंबई महापालिकेने ३० सप्टेंबर २०१९ रोजी जारी केलेल्या परिपत्रकामुळे रिक्त पदे भरता आलेली नव्हती. ९ सप्टेंबर २०२० रोजी महापालिका आयुक्तांनी नवीन भरतीवर लावण्यात आलेल्या निर्बंधापासून अग्निशमन खाते वगळण्यात मान्यता दिली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहिती अधिकारातून रिक्त पदाची माहिती समोर आणत याबाबतीत ६ सप्टेंबर २०२० रोजी लेखी तक्रार केली होती.

मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख अग्निशमन अधिकारी शशिकांत काळे यांनी त्यानंतर व्यक्तिशः प्राधान्य दिले आहे. मुंबई  अग्निशमन दल ही अत्यावश्यक सेवा असून रिक्त पदे भरल्यानंतर कामकाजास वेग येईल, असा दावा केला जात आहे. 

 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Permission for new recruitment in Mumbai Fire Brigade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.