एमएमआरडीए कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी घरे
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2019 04:09 IST2019-02-07T04:08:50+5:302019-02-07T04:09:46+5:30
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातील संवर्ग तीन आणि चारच्या १११ कर्मचाºयांना बुधवारी सोडत काढून कायमस्वरुपी घरे देण्यात आली.

एमएमआरडीए कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी घरे
मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातील संवर्ग तीन आणि चारच्या १११ कर्मचाºयांना बुधवारी सोडत काढून कायमस्वरुपी घरे देण्यात आली. या घरांपैकी ९९ घरे ठाण्यातील पाचपाखडी आणि १२ घरे मिरा-भाईंदरमधील महाजनवाडीमध्ये आहेत. या कर्मचाºयांना घर वाटप-पत्रे आवश्यक प्रक्रियेनंतर दिली जातील. भाडेतत्त्वावर बांधण्यात येत असलेल्या सदनिकांपैकी ५ टक्के सदनिका गिरणी कामगारांना, उर्वरित ५ टक्क्यांपैकी ३ टक्के सदनिका एमएमआरडीएच्या संवर्ग तीन आणि चारच्या कर्मचारी वर्गास; ज्यांना एमएमआरडीएमध्ये कायमस्वरुपी पदावर तीन वर्षे पूर्ण झाली आहेत त्यांना वाटप करण्यात याव्यात, असा निर्णय झाला होता. हे कर्मचारी राज्याच्या विविध भागातून दाखल होत असून, मुंबईमध्ये सहज घरे उपलब्ध होत नाही. परिणामी हा निर्णय घेण्यात आला़