Join us  

एका वेगळ्या चष्म्यातून लोकं मला पाहतात, अमृता फडणवीसांचं परखड मत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2021 12:14 PM

अमृता फडणवीस यांनी लोकमत सखीमध्ये गाण्यांपासून राजकारणापर्यंत विविध विषयावर परखडपणे मत मांडलं. त्यांचं गणेश वंदना हे नवं गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे.

मुंबई - विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि गायिका म्हणून नावलौकिक मिळवलेल्या अमृता फडणवीस यांचं आणखी एक गाणं प्रदर्शित झालं आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 'गणेश वंदना' या टायटलने हे साँग रिलीज करण्यात आलंय. भक्ती म्हणजे सेवा हा संदेश त्यांनी या गाण्यातून दिलाय. अमृता फडणवीस यांना त्यांच्या गाण्यासंदर्भात सोशल मीडियातील ओव्हरव्ह्यूजबद्दल विचारणा केली असता, त्यांनी स्पष्टपणे उत्तर दिले. 

अमृता फडणवीस यांनी लोकमत सखीमध्ये गाण्यांपासून राजकारणापर्यंत विविध विषयावर परखडपणे मत मांडलं. त्यांचं गणेश वंदना हे नवं गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे. त्यासंदर्भात त्यांनी लोकमत सखी मंचावर गप्पा मारल्या. यावेळी, आपल्या गाण्यासंदर्भात लोकाचं मत कसं आहे, हे विचारल्यावर त्यांनी परखडपणे आपलं मत व्यक्त केलं. जेव्हा माझं गाणं प्रदर्शित होतं, तेव्हा काही लोकं मला एका वेगळ्या चष्म्यातून पाहतात. मी एका भाजपा नेत्याची पत्नी आहे, म्हणून मी काहीही केलं किंवा म्हटलं. तर, या लोकांना वाटतं की, मी तेथून प्रेरणा घेऊनच हे करत आहे. पण, माझ्या ट्विटरवरील ज्या कमेंट असतात, त्या माझ्या विचारानुसार, मला वाटलं की असं लोकांपुढे म्हणायचं आहे, तर ते ट्विट केललं असतं. माझा भाजपाकडे कल आहे, किंवा मी देवेंद्र फडणवीसांची पत्नी आहे, म्हणून ते लिहित नाही, असे अमृता फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले. तसेच, गाणं ही माझी फॅशन आहे, त्यामुळे मी गाणं करत असते, असेही त्यांनी म्हटलं.  

भक्तीचं दुसरं नाव सेवा

अमृता फडणवीस या गायन क्षेत्रात करिअर करत आहेत. गाणं हा त्यांचा आवडता छंद आहे, यापूर्वीही त्यांची अनेक गाणी रिलीज झाली आहेत. आपल्या गाण्यांमधून सामाजिक विषयांवरही त्यांनी भाष्य केलं आहे. 'गणेश वंदना' या गाण्यातूनही त्यांनी एक सुंदर मेसेज दिला आहे. कोरोना काळातील कोविड योद्ध्यांना हे गाणं त्यांनी समर्पित केलंय. एकूण 4 मिनिट 49 सेकंदाचं हे गाणं आहे. या गाण्यात अमृता फडणवीस तुम्हाला डॉक्टरच्या वेशात दिसून येतील. ‘भक्तीचे दुसरे नाव सेवा’ असे त्यांनी या गाण्याद्वारे सांगण्याचा प्रयत्न केला आहे.  

टॅग्स :अमृता फडणवीसदेवेंद्र फडणवीसगणेशोत्सवभाजपा