धारावीतील प्रलंबित सर्वेक्षण पूर्ण करणार; १ ते १५ नोव्हेंबरदरम्यान रहिवाशांना पुन्हा संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 06:46 IST2025-10-27T06:45:41+5:302025-10-27T06:46:02+5:30

ज्यांचे सर्वेक्षण अद्याप सुरू आहे किंवा नुकतेच पूर्ण झाले आहे, त्यांचा समावेश पुढील यादीत करण्यात येणार आहे.

Pending survey in Dharavi to be completed Residents will get another chance between November 1 and 15 | धारावीतील प्रलंबित सर्वेक्षण पूर्ण करणार; १ ते १५ नोव्हेंबरदरम्यान रहिवाशांना पुन्हा संधी

धारावीतील प्रलंबित सर्वेक्षण पूर्ण करणार; १ ते १५ नोव्हेंबरदरम्यान रहिवाशांना पुन्हा संधी

मुंबई : अपुरी कागदपत्रे किंवा अन्य कारणांमुळे, सर्वेक्षणाची प्रक्रिया पूर्ण न केलेल्या धारावीकरांना राज्य सरकारने पुन्हा संधी दिली आहे. सर्व लाभार्थ्यांना पुनर्विकासात सामावून घेण्याच्या उद्देशाने, धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या (डीआरपी)  वतीने दस्तावेज संकलनासाठी १ ते १५ नोव्हेंबरदरम्यान मोहीम घेण्यात येणार आहे.  
प्रत्येक पात्र कुटुंबाचा सहभाग सुनिश्चित करतानाच एकही लाभार्थी कुटुंब पुनर्विकासापासून वंचित राहू नये, यासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या मोहिमेचा लाभ रहिवाशांनी घ्यावा, असे आवाहन शासनाच्या वतीने करण्यात आले आहे. दोन आठवड्याच्या मोहिमेत, अपूर्ण अथवा अंशतः पडताळणी झालेल्या प्रकरणांची नोंद पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्यामुळे सर्व रहिवाशांनी दस्तावेज संकलन केंद्रांवर आवश्यक दस्तावेज जमा करावेत, असे आवाहन डीआरपीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने केले.

आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून आपल्या सदनिकांचे सर्वेक्षण पूर्ण केलेल्या धारावीकरांना प्राधान्य देण्यासाठी, परिशिष्ट २ म्हणजेच ड्राफ्ट अनेक्स्चर-२ जारी करायला सुरुवात झाली आहे. ज्यांचे सर्वेक्षण अद्याप सुरू आहे किंवा नुकतेच पूर्ण झाले आहे, त्यांचा समावेश पुढील यादीत करण्यात येणार आहे. आजवर धारावीतील १ लाखाहून अधिक रहिवाशांनी त्यांच्या सदनिकेच्या सर्वेक्षणाची प्रक्रिया पूर्ण केली आहे.

नेमके काय हाेणार?

मोहिमेत उपजिल्हाधिकारी, तहसीलदार आणि सर्वेक्षण अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात धारावीमध्येच सेक्टरनिहाय तात्पुरत्या कार्यालयांची उभारणी करण्यात येणार आहे. दस्तावेजांचे संकलन, पडताळणी आणि तक्रार निवारण अशा पद्धतीचे काम या कार्यालयांतून केले जाईल.

घरोघरी जाणारे सर्वेक्षण अधिकारी आणि मध्यवर्ती कॉल सेंटरच्या माध्यमातून या मोहिमेचा कालावधी, आवश्यक दस्तावेज व अन्य माहिती रहिवाशांपर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.

मोहीम निर्धारित केलेल्या कार्यालयांमध्ये दररोज सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यंत राबविली जाईल. शालीमार इंडस्ट्रीयल इस्टेट, १०१/१०२,ओ विंग, कामराज स.गृ. संस्था, बालाजी नगर आणि एनएमडीपीएल, आंबेडकर स्कूल जवळ येथे ही मोहीम असेल.
 

Web Title : धारावी पुनर्विकास: सर्वेक्षण फिर से शुरू, निवासियों के लिए मौका, 1-15 नवंबर

Web Summary : धारावी के निवासियों को 1-15 नवंबर तक लंबित सर्वेक्षण पूरा करने का एक और मौका। सरकार का लक्ष्य सभी लाभार्थियों को पुनर्विकास में शामिल करना है। दस्तावेज़ संग्रह और सत्यापन के लिए शिविर लगाए जाएंगे, ताकि कोई भी पात्र परिवार छूट न जाए। 1 लाख से अधिक निवासियों ने सर्वेक्षण पूरा किया।

Web Title : Dharavi Redevelopment: Survey Resumes, Opportunity for Residents, November 1-15

Web Summary : Dharavi residents get another chance to complete pending survey from November 1-15. The government aims to include all beneficiaries in redevelopment. Camps will be set up for document collection and verification, ensuring no eligible family is left out. Over 1 lakh residents have completed surveys.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.